Menu Close

हिंदूंनी आर्थिक बहिष्‍काराची धमकी देताच मुसलमान नरमले !

यवतमाळ येथे पोळ्‍याच्‍या निमित्ताने भरणार्‍या बाजाराच्‍या संदर्भातील घटना

  • नाक दाबल्‍यावर कसे तोंड उघडते, हे लक्षात घेऊन सर्वत्रच्‍या हिंदूंनी हीच नीती वापरली, तर वारंवार हिंदूंवर अत्‍याचार करणारे धर्मांध वठणीवर येतील !
  • ‘चोराच्‍या उलट्या बोंबा’ मारणारे धर्मांध. या बाजाराच्‍या वेळी प्रत्‍यक्षात धर्मांधांकडून हिंदु मुली आणि महिल यांची छेड काढली जात उलटा ‘फतवा’ काढणारे धूर्त धर्मांध !
  • मुसलमान महिलांना बाजारात न जाण्‍याचे आवाहन करून धर्मांधांचा बाजारात अराजक माजवण्‍याचा हेतू होता कि काय ? असाच संशय घेण्‍यास पुष्‍कळ वाव रहातो ! -संपादक 

यवतमाळ (महाराष्ट्र) – शहरात केदारेश्‍वर मंदिर परिसरात २ सप्‍टेंबरपासून मोठ्या प्रमाणात साजर्‍या होणार्‍या पोळा या सणाच्‍या पार्श्‍वभूमीवर ३ दिवसांची यात्रा भरते. येथील बाजारात ९० टक्‍के मुसलमानांची दुकाने असूनही स्‍थानिक मुसलमान संघटनेने आक्षेपार्ह पत्रक काढले. त्‍यावर हिंदुत्‍वनिष्‍ठांनी सडेतोड प्रत्‍युत्तर आणि निवेदन दिल्‍याने मुसलमानांनी क्षमा मागून नरमाईची भूमिका घेतली.

१. यवतमाळ येथील गुलशन-ए-रजा-ट्रस्‍ट या मुसलमानांच्‍या संघटनेने, ‘सर्वांना विनंती आहे की, आपल्‍या घरातील महिलांना पोळ्‍याच्‍या निमित्ताने भरणार्‍या बाजारात खरेदीसाठी पाठवू नका. सध्‍या वातावरण खराब आहे. तिथे छेडछाडही होते. त्‍यामुळे थोडे पैसे वाचावण्‍यासाठी या बाजारात महिलांना पाठवू नका’, अशा आशयाचे पत्रक वितरित केले.

२. या संदर्भात हिंदूंनी संतप्‍त प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या. यानंतर विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी, ‘प्रतिवर्षी अनेक विधर्मी (मुसलमान) या बाजारात त्‍यांचा व्‍यवसाय करतात; परंतु त्‍याच्‍या आड हिंदु महिला आणि भगिनी यांची छेडछाड होण्‍याच्‍या घटना प्रत्‍येक वर्षी घडतात. हा सण हिंदु धर्मियांचा आहे. त्‍यामुळे हिंदु माता आणि भगिनी यांना विनंती आहे की, आपण पोळ्‍यामध्‍ये खरेदीसाठी जातांना विशेष काळजी घ्‍यावी. या वर्षी पोळ्‍यात हिंदु बांधवांकडूनच खरेदी करावी. आपला सण आणि आपली माणसे जपावी. जो गोरक्षणासाठी झटतो, त्‍याच्‍याशी व्‍यवहार करून सण साजरा करावा; जेणेकरून आपली बहीण, आई, मुलगी सुरक्षित राहील’, अशा आशयाचे पत्रक प्रसिद्ध केले.

३. या पत्रकात शेवटी ‘ज्‍याच्‍या अंगी हिंदुत्‍व त्‍याच्‍याशी आमचे बंधुत्‍व !’ अशी ओळ लिहिली असून या पत्रकात मुसलमान संघटनेने काढलेला वरील विनंतीवजा ‘फतवा’ही मुद्रीत केला आहे.

४. सकल हिंदु समाजाच्‍या वतीने जिल्‍हाधिकार्‍यांना या संदर्भात निवेदन देण्‍यात आले. हिंदुत्‍वनिष्‍ठांनी या संदर्भात एक व्‍हिडिओही सामाजिक माध्‍यमावर प्रसिद्ध केला आहे. त्‍यात ते म्‍हणतात, ‘येथे परप्रांतीयही व्‍यवसाय करण्‍यासाठी येतात. या सणाच्‍या २ दिवसांत यवतमाळमध्‍ये ५० कोटी रुपयांपर्यंत होणार्‍या उलाढालीत काळ्‍या पैशांचा वापर होतो. येथील वातावरण खराब होते, तर मुसलमान या बाजारात दुकाने का लावतात ? त्‍यांना यात्रेत दुकाने लावण्‍याची अनुमती न देता पोस्‍टल मैदान येथे त्‍यांनी दुकाने लावावीत. जेथे वातावरण खराब आहे, त्‍या दुकानातून हिंदु महिलांनी खरेदी करू नये.’

सकल हिंदु समाजाच्‍या वतीने जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन

५. हिंदुत्‍वनिष्‍ठांनी घेतलेल्‍या रोखठोक भूमिकेनंतर गुलशन-ए-रजा-ट्रस्‍ट या संघटनेच्‍या महमंद इसाक शेख या अध्‍यक्षाने लगेचच, ‘सर्व हिंदु आणि मुसलमान बांधवांना विनंती आहे की, आम्‍ही मुसलमान महिलांना पोळ्‍याच्‍या बाजारात न जाण्‍याची विनंती केली होती. त्‍यात कुठल्‍या धर्माच्‍या भावना दुखावण्‍याचा हेतू नव्‍हता. आमच्‍या या विनंतीमुळे कुणाच्‍या भावना दुखावल्‍या गेल्‍या असतील, तर आम्‍ही क्षमा मागतो’, अशा आशयाचे पत्रक प्रसिद्ध केले.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News