Menu Close

फाळणीच्‍या वेळी पाकिस्‍तानातून पलायन केलेले एकही हिंदु कुटुंब त्‍यांच्‍या सर्व सदस्‍यांसह भारतात पोचले नाही

सौ. मीनाक्षी शरण

देहराडून (उत्तराखंड) – अयोध्‍या फाऊंडेशनच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाक्षी शरण यांनी येथे आयोजित ‘शाश्‍वत भारत संवाद’ कार्यक्रमात बोलतांना भारत-पाक(India-Pakistan) फाळणीच्‍या वेळच्‍या भीषण स्‍थितीचा उल्लेख केला. त्‍या काळात ज्‍यांनी प्राण गमावले, त्‍यांच्‍यासाठी श्राद्ध करण्‍याचे महत्त्व त्‍यांनी विशद केले. ‘फाळणीच्‍या वेळी पाकिस्‍तानातून पलायन केलेले एकही हिंदु (Hindu) कुटुंब भारतात कुटुंबातील सर्व सदस्‍यांसह पोचले नाही’, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

त्‍या पुढे म्‍हणाल्‍या की,

१. सध्‍याच्‍या पिढीतील हिंदूंना फाळणीच्‍या इतिहासाची माहिती असणे आवश्‍यक आहे. तसेच फाळणीच्‍या वेळी ज्‍यांना भीषण परिस्‍थितीला तोंड द्यावे लागले, ‘त्‍या हिंदूंच्‍या पूर्वजांचे काय झाले ?’, याचीही माहिती असणे आवश्‍यक आहे.

२. लाखो हिंदू आणि शीख मारले गेले, तर अनेकांनी उन्‍मादी धर्मांधांपासून त्‍यांच्‍या प्रतिष्‍ठेचे रक्षण करण्‍यासाठी स्‍वत:ची आणि त्‍यांच्‍या प्रियजनांची हत्‍या केली.

३. पाकिस्‍तानातून हिंदु आणि शीख यांना त्‍यांचे कुटुंब आणि सामान गोळा करण्‍यासाठीही संधी न देता जीव वाचवण्‍यासाठी पलायन करण्‍यास भाग पाडले गेले. चूलींवर शिजत असलेले अन्‍नही मागे सोडून अनेकांनी घरे सोडली.

४. हिंदु महिलांवर सामूहिक बलात्‍कार केले गेले आणि अनेक महिलांना ओलीस ठेवले गेले. गरोदर महिलांचे पोट फाडून न जन्‍मलेल्‍या बाळांना बाहेर काढून ठार मारले.

५. अशा हिंदूंसाठी श्राद्ध तर सोडाच, मृत्‍यूमुखी पडलेल्‍या बहुसंख्‍य हिंदूंवर अंत्‍यसंस्‍कारही झाले नाहीत. असे अनेक मृतदेह गिधाडांनी खाऊन टाकले.

६. गेल्‍या १ सहस्र ४०० वर्षांत हिंदूंच्‍या विषयी हेच होत आले आहे. हिंदुकुश पर्वतांनी हिंदु महिलांवर झालेले बलात्‍कार, लैंगिक गुलामगिरी हिंदूंचे झालेले खून अशा असंख्‍य भीषण घटना पाहिल्‍या आहेत.

७. फाळणीच्‍या वेळी मारल्‍या गेलेल्‍यांचे स्‍मरण करणे, हे आजच्‍या पिढीचे कर्तव्‍य आहे. धर्माचे रक्षण व्‍हावे, येणार्‍या पिढ्या हिंदु रहाव्‍यात म्‍हणून आपल्‍या पिढ्यांनी स्‍वत:चे बलीदान दिले.

८. २ ऑक्‍टोबर २०२४ या दिवशी सर्वपित्री अमावस्‍येला सामूहिक तर्पण विधी आयोजित केले जातील. ज्‍यांना शक्‍य आहे, त्‍यांनी १७ सप्‍टेंबर २०२४ पासून चालू होणार्‍या पितृपक्षाच्‍या संपूर्ण कालावधीत श्राद्ध करावे.

९. हिंदूंनी हिंदु धर्मातील अशा विधींचे महत्त्व जाणून घ्‍यावे आणि आपल्‍या वंशातील सर्व दिवंगत आत्‍म्‍यांच्‍या आध्‍यात्मिक लाभासाठी श्राद्ध करावे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News