कथित ईश्वरनिंदेवरून बांगलादेशातील पोलीस ठाण्यातच हिंदु तरुणाच्या केलेल्या हत्येचे प्रकरण
बांगलादेश हा हिंदूंसाठी नरकाहूनही वाईट झाला आहे. तेथील हिंदूंच्या दुर्दशेच्या विरोधात भारतातील हिंदू पेटून उठणार आहे कि नाही ? -संपादक
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील खुलना येथे ईश्वरनिंदेच्या आरोपावरून जमावाने मारहाण केलेला हिंदु युवक उत्सव मंडल जिवंत आहे, असे बांगलादेशाच्या आंतरसेवा जनसंपर्क संचालनालयाने (आय.एस्.पी.आर्.ने) घोषित केले आहे. संचालनालयाने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्सव मंडल याच्यावर सैन्याच्या देखरेखीखाली रुग्णालयात उपचार चालू आहेत आणि आता त्याचे स्वास्थ्य चांगले आहे. असे असले, तरी बांगलादेशातील काही हिंदु नेत्यांनी ‘सनातन प्रभात’ला माहिती दिली की, हिंसाचारी मुसलमानांनी उत्सवचे दोन्ही डोळे काढून ते चिरडले आहेत.
१. ४ सप्टेंबरला फेसबुकवर महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या आरोपावरून ३ सहस्र ते ५ सहस्र मुसलमानांच्या जमावाने उत्सवला पोलीस ठाण्यातच मारहाण केली होती. या मारहाणीत उत्सवचा मृत्यू झाला, असे बांगलादेश पोलिसांनी घोषित केले होते.
२. यानंतर ६ सप्टेंबरला बांगलादेशाच्या आंतरसेवा जनसंपर्क संचालनालयाने स्पष्टीकरण देत सांगितले की, रक्तपिपासू मुसलमान जमावाला पांगवण्यासाठी जवळच्या मशिदींच्या ध्वनिक्षेपकांवरून हिंदु तरुणाचा मृत्यू झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर जमाव माघार घेत असल्याचेही सांगण्यात आले.
३. ‘सशस्त्र दलांच्या प्रयत्नांमुळे उत्सवचा जीव वाचवण्यात आला आणि नंतर रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याला रुग्णालयातून सोडल्यानंतर त्याच्यावर ईश्वरनिंदेच्या प्रकरणात संबंधित अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात येईल’, असेही संचालनालयाने सांगितले आहे.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात