-
द्रमुक सत्तेत असलेल्या तमिळनाडू राज्यातील घटना
-
इस्लामी संघटनांनी केली होती सरकारकडे तक्रार !
- हिंदुद्वेषी नास्तिकतावादी असणार्या द्रमुक पक्षाच्या सरकारच्या काळात याहून वेगळे काय होणार ? अशा अधर्मियांना त्यांच्या कर्माची फळे नक्कीच मिळतील, असेच हिंदु धर्मातील कर्मफलन्यायाचा सिद्धांत सांगतो !
- मदरशांमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांना काय शिकवले जाते, याची माहिती द्रमुक सरकार घेते का ? हिंदु संघटना अशा शिक्षणाकडे लक्ष देऊन त्याची माहिती सरकारला देतील का ? -संपादक
चेन्नई (तमिळनाडू) – येथील अशोकनगर मुलींची शाळा या सरकारी शाळेमध्ये आध्यात्मिक प्रबोधनाच्या वर्गाचे अयोजन केल्यावरून राज्यातील द्रमुक सरकारने मुख्याध्यापकांचे स्थानांतर केले आहे. तसेच या वर्गात व्याख्यान देणारे वक्ते महाविष्णु यांना तमिळनाडू पोलिसांनी चेन्नई विमानतळावर अटक केली.
१. या शाळांमध्ये ‘परमपोरुल फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेचे वक्ते महाविष्णु यांनी धर्म, पुण्य, पाप आणि मंदिर यावर व्याख्यान दिले होते. ते म्हणाले होते की, आपल्या पूर्वीच्या कर्माची शिक्षा आपल्याला या जन्मातच मिळते. गुरुकुल व्यवस्था अशी होती ज्याने मूलत: वर्ण आणि लिंग यांच्या आधारावर शिक्षणाला अनुमती दिली; पण इंग्रजांनी ते संपवले. असे काही श्लोक आहेत जे अग्नीचा वर्षाव करतात, रोग बरे करतात. हे सर्व आपल्या पूर्वजांनी शास्त्रांच्या रूपात लिहिले होते; पण इंग्रजांनी ते खोडून काढले.
२. महाविष्णु यांच्या व्याख्यानाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ्.आय.) आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस्.एफ्.आय.) या कट्टरतावादी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. तसेच या व्याख्यानाची माहिती सरकारपर्यंत पोचली. यानंतर शिक्षण मंत्रालयाने मुख्याध्यापकांचे स्थानांतर केले. (कट्टरतवादी राजकीय पक्षांच्या तालावर नाचणारे द्रमुक सरकार ! – संपादक)
३. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर शिक्षणमंत्री अनबिल महेश शाळेत पोचले. ते म्हणाले की, या कार्यक्रमाला अनुमती कुणी दिली, याची चौकशी केली जाईल. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. अहवालाच्या आधारे २ दिवसांत कारवाई केली जाईल.
(म्हणे) ‘शिक्षण व्यवस्थेत केवळ विज्ञानाची आवश्यकता !’ – मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन
मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन म्हणाले की, आमच्या शालेय पद्धतीच्या पुस्तकांमध्ये वैज्ञानिक विषय आहेत. विद्यार्थ्यांनी हे वाचावे आणि जाणून घ्यावे. आपल्या शिक्षणव्यवस्थेत केवळ विज्ञानाची आवश्यकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास होईल. नवीन कल्पना घेऊन शिक्षकही विद्यार्थ्यांच्या प्रगतीत हातभार लावू शकतात. राज्यातील सर्व शाळांमध्ये होणार्या कार्यक्रमांसाठी मी नवीन मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. आमच्या शाळेतील मुले हे तमिळनाडूचे भविष्य आहेत.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात