Menu Close

‘वन्‍दे भारत’ एक्‍सप्रेसमध्‍ये चोरी करणारा हर्षित चौधरी निघाला शहाबाज मुश्‍ताक अली खान

मुसलमानांचा ‘नाम जिहाद’ ! हिंदु नावे धारण करण गुन्‍हे करायचे आणि हिंदु समाजाचे नाव मलीन करायचे हा मुसलमानांचा डाव नसेल कशावरून ?
या प्रकरणी आरोपीसह त्‍याला बनावट आधारकार्ड बनवून देणार्‍या प्रशासकीय कर्मचार्‍यांवरही कठोर कारवाई व्‍हायला हवी ! – संपादक 

कर्णावती (गुजरात) – येथील ‘वन्‍दे भारत’ रेल्‍वेगाडीतून चोरी केल्‍याच्‍या प्रकरणी अटकेत असलेला मेजर हर्षित चौधरी याच्‍या चौकशीतून धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ५ सप्‍टेंबर या दिवशी कर्णावती येथून अटक करण्‍यात आलेला मेजर हर्षित चौधरी हा शहबाज मुश्‍ताक अली खान असल्‍याचे समोर आले आहे. त्‍याने बनावट आधारकार्ड बनवून हर्षित चौधरी याच नावाचे रेल्‍वेचे आरक्षण केले होते.

१. पोलिसांनी  हे ओळखपत्र जप्‍त केले आहे. या ओळखपत्रात शहबाजचे छायाचित्र आहे; परंतु नाव हर्षित चौधरी लिहिले आहे. तसेच तो सैन्‍याधिकारी असून त्‍याचे पद मेजर असे आहे.

२. त्‍याच्‍या बनावट आधारकार्डवर तो राजस्‍थानचा रहिवासी असल्‍याचे लिहिले असले, तरी तो मूळचा उत्तरप्रदेशातील अलीगढ जिल्‍ह्याचा रहिवासी आहे.

३. शहबाज मुश्‍ताक अली खान याने या बनावट ओळखपत्रावर देशांतर्गत विमानाने ३ वेळा आणि रेल्‍वेनेही प्रवास केला आहे. शहबाज मुश्‍ताक अली खान हा विवाहित असून त्‍याला २ मुले आहेत.

४. शहाबाजचे वडील मुश्‍ताक अली खान हे भारतीय सैन्‍यातून निवृत्त झाले आहेत, तर एक भाऊ भारतीय हवाईदलात आहे. या प्रकरणी आरोपीला शहाबाजला न्‍यायालयीन कोठडी सुनावण्‍यात आली आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News