Menu Close

जहाजपूर (राजस्‍थान) येथे हिंदूंच्‍या मिरवणुकीवर मशिदीतील धर्मांधांकडून आक्रमण

  • सलग २० ते २५ मिनिटे चालू होती दगडफेक

  • मशीद बुलडोझरने पाडण्‍याचे भाजपच्‍या आमदाराचे आश्‍वासन

  • भारतात सत्ता कुणाचीही असो, हिंदूंच्‍या मिरवणुकीवर मशिदी अथवा दर्गे येथून मुसलमान आक्रमण करतात आणि दहशत पसरवतात, हे आता नित्‍याचेच झाले आहे. हे रोखण्‍याची इच्‍छाशक्‍ती असणारे शासनकर्ते भारताला लाभले नाहीत, हे संतापजनक !
  • आज हिंदूंच्‍या मिरवणुकीवर दगडफेक करणारे मुसलमान भविष्‍यात हिंदूंना घरात घुसून मारहाण करण्‍यास मागे-पुढे पहाणार नाहीत. ही स्‍थिती उद़्‍भवू नये, यासाठी भारताला हिंदु राष्‍ट्र घोषित करणे आवश्‍यक !
  • भारतातील अनेक मशिदी या हिंदुविरोधी आणि जिहादी कारवाया यांचे अड्डे बनले असल्‍याचे अनेक पुरावे सुरक्षायंत्रणांकडे आहेत. असे असतांनाही त्‍यांना टाळे का ठोकले जात नाही ? – संपादक 

जयपूर (राजस्थान) – भिलवारा जिल्‍ह्यातील जहाजपूर येथे मुसलमानांनी हिंदूंच्‍या मिरवणुकीवर आक्रमण केले. १४ सप्‍टेंबर या दिवशी एकादशीच्‍या निमित्ताने हिंदूंनी येथे मिरवणुकीचे आयोजन केले होते. ही मिरवणूक जामा मशिदीच्‍या समोरून जात असतांना मशिदीतून हिंदूंवर दगडफेक करण्‍यात आली. ही दगडफेक साधारण २०-२५ मिनिटे चालू होती. यामुळे अनेक हिंदू घायाळ झाले. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. या सर्वांची कसून चौकशी करण्‍यात येत आहे. या घटनेनंतर शहरातील पोलिसांचा बंदोबस्‍त वाढवण्‍यात आला आहे.

१. या दगडफेकीमुळे हिंदू भयभीत झाले आणि सैरावैरा पळू लागले. यामुळे परिसरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेमुळे बाजार बंद ठेवण्‍यात आला.

२. काही वेळाने हिंदू एकत्रित जमा झाले आणि त्‍यांनी निदर्शने केली. याविषयी माहिती मिळताच जहाजपूर येथील भाजपचे आमदार गोपीचंद मीना हेही निदर्शनांमध्‍ये सहभागी झाले. ‘ही मशीद बुलडोझरने पाडण्‍यात येईल’, असे आश्‍वासन त्‍यांनी हिंदूंना दिले.

३. १० जणांना अटक केल्‍यानंतर गोपीचंद मीना यांनी हिंदूंना निदर्शने थांबवण्‍याची विनंती केली.

नगरपालिकेडून मशिदीला नोटीस

यानंतर जहाजपूर नगरपालिकेने मशिदीच्‍या मालकाला नोटीस बजावली आहे. या मशिदीच्‍या मालकाने २४ घंट्यांमध्‍ये भूमीची मालकी आणि मशिदीचे बांधकाम यांविषयी कागदपत्रे येत्‍या २४ घंट्यांमध्‍ये नगरपालिकेच्‍या कार्यालयात जमा करण्‍याचा त्‍यांना आदेश देण्‍यात आला आहे.

शहरातील मुसलमानांचे अवैध बांधकाम पाडले

या घटनेंनतर नगरपालिकेच्‍या अधिकार्‍यांनी मुसलमानांनी अवैधरित्‍या बसस्‍टँडच्‍या बाजूला उभारलेले बांधकाम पाडले. या कारवाईला जिल्‍हाधिकारी राजेंद्रसिंह शेखावत यांनीही दुजोरा दिला आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News