Menu Close

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर; तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या पुरुषाशी लावले लग्न

पाकिस्तानमध्ये हिंदू असुरक्षित ! पाकिस्तानमध्ये अल्पसंख्य हिंदूंवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकार पाकिस्तानवर कधी दबाव आणणार ? – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिचे बलपूर्वक धर्मांतर केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे कुटुंबीय धर्मांतर रोखण्यासाठी मदरशामध्ये पोचले तेव्हा त्यांना तेथून हाकलून लावण्यात आले.

याविषयीच्या एका वृत्तानुसार, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हुंगुरु गावातून ११ सप्टेंबर या दिवशी अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी चौकशी चालू केली. या वेळी त्यांना समजले की, त्यांच्या मुलीचे तिच्या दुप्पट वयाच्या मुसलमान पुरुषाशी घाईघाईन लग्न करण्यात आले. १२ सप्टेंबर या दिवशी पीडित मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करण्यासाठी तिला मदरशात आणणार असल्याचे तिच्या कुटुंबियांना समजले. त्यांच्या मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी मदरसा गाठला; परंतु इस्लामी कट्टरवाद्यांनी त्यांना तेथून हाकलून लावले.

पाकिस्तान दारावर इत्तेहाद संघटनेचे प्रमुख शिवा फकीर काची यांनी आरोप केला आहे की, हिंदु मुलींसमवेत अशा गंभीर घटना आता तिथे सामान्य झाल्या आहेत. पाकिस्तानातील गरीब हिंदूंना जिहाद्यांकडून लक्ष्य केले जाते.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News