आंतरराष्ट्रीय मानवी आयोगाला बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार दिसत नाहीत का ? – संपादक
ढाका (बांगलादेश) – येथील विद्यापिठात हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांशी विवाह लावण्याची योजना आखली आहे. लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या हिंदु मुलींचे धर्मांतर करण्यासाठी मुसलमान तरुण या संधीचा वापर करत आहेत.
त्यांच्या ‘टेलिग्राम’ गटातील संदेशांद्वारे उघड केले की, त्यांनी ११ हिंदु तरुणींचे धर्मांतर करून त्यांचे मुसलमान तरुणांशी विवाह करण्याची योजना आखली आहे. यांतील एका हिंदु तरुणीच्या कुटुंबियांनी सांगितले की, तरुणीला एका मुसलमान तरुणाने ढाका विद्यापिठाच्या हॉलमध्ये विवाह करण्यासाठी कह्यात घेतले होते.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात