Menu Close

शेगाव आणि भिवंडी येथे धर्मांधांकडून गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक

शेगाव येथे संतप्त गणेशोत्सव मंडळांनी एकाच ठिकाणी २ घंटे मिरवणूक थांबवली !

  • हिंदूंच्या मिरवणुकांमध्ये होणारी धर्मांधांची आक्रमणे थांबण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • पोलीस हिंदूंचे रक्षण करण्यास सक्षम नाहीत, हेच यावरून लक्षात येते. त्यामुळे मिरवणुकीच्या रक्षणार्थ आता हिंदूंनीच संरक्षण पथके सिद्ध केली पाहिजेत ! – संपादक 
शेगाव २ घंटे मिरवणूक थांबवली !

बुलढाणा (महाराष्ट्र) – जिल्ह्यातील शेगाव शहरात किरकोळ वादातून धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली, तसेच भिवंडी (जिल्हा ठाणे) येथेही धर्मांधांनी गणेशमूर्तीवर दगड आणि चपला फेकून विटंबना केली.

शेगाव येथे ‘जोपर्यंत दगडफेक करणार्‍यांवर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणार नाही’, अशी खंबीर भूमिका गणेशोत्सव मंडळांनी घेतली. त्यामुळे २ घंटे मिरवणूक एकाच जागेवर थांबून होती. घरांच्या गच्चीवरून दगडफेक केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. या दगडफेकीत काही जण घायाळ झाले असून परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

यंदांच्या गणेशोत्सव मिरवणुकीत भिवंडी (जिल्हा ठाणे), अमळनेर (जिल्हा जळगाव), राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशही येथेही मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.

भिवंडीत शांतीनगर भागात श्री गणेशमूर्तीवर दगड आणि चपला फेकल्या !

भिवंडी (जिल्हा ठाणे) – शांतीनगर भागात श्री गणेशमूर्तीवर चपला फेकण्यात आल्या आणि दगडफेक करण्यात आली. यामध्ये एक मुलगी आणि महिला घायाळही झाली. हिंदू रात्री पुष्कळ विलंबाने विसर्जनासाठी जात होते, त्या वेळी ही घटना घडली. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत रात्री साडेबारा वाजता धक्काबुक्की झाली, असेही समजते. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अचलपूर (अमरावती) येथेही मिरणुकीवर दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. याविषयी भाजपचे आमदार अनिल बोंडे यांनी पोलिसांची भेट घेऊन कारवाईच्या संदर्भात चर्चा केली.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News