Menu Close

तेलंगाणातील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना कर्नाटकातील बागलकोट जिल्हाबंदी

कर्नाटकातील हिंदुद्वेषी काँग्रेस सरकारचा निर्णय

भाग्यनगर (तेलंगाणा) – कर्नाटकातील हिंदुद्वेषी काँग्रेस सरकारने तेलंगाणातील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्यावर ३ महिन्यांसाठी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात जाण्यास बंदी घातली आहे. ते बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ शहरात श्री गणेशमूर्ती विसर्जनच्या कार्यक्रमात सहभागी होणार होते; मात्र त्याआधीच कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकार्‍यांनी त्यांच्यावर बंदी घातली.

१. आमदार टी. राजा सिंह यांना बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ टाऊन येथील श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

२. बागलकोट जिल्हादंडाधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार, कर्नाटक पोलीस त्यांच्या भाग्यनगर (तेलंगाणा) येथील निवासस्थानी गेले आणि जिल्हादंडाधिकार्‍यांनी बजावलेली नोटीस त्यांना दिली. या नोटीसमध्ये त्यांच्यावर राज्यात येण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचे म्हटले होते.

३. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या भाषणांमुळे २ समुदायांमध्ये द्वेष पसरतो. वर्ष २०१५ मध्येही कर्नाटकात धार्मिक हिंसाचार पसरवल्याविषयी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. मुधोळमध्ये ज्या ठिकाणी श्री गणेशमूर्ती विसर्जन होणार आहे, ते ठिकाण अतिशय संवेदनशील आहे, असेही या नोटिसीत म्हटले आहे.

४. यानंतर आमदार राजा सिंह यांनी सामाजिक माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. ‘माझ्यामुळे कुठेही धार्मिक हिंसाचार झाला नाही. माझ्यावर नोंदवलेल्या सर्व प्रकरणांमध्ये मी उच्च न्यायालयात विजयी झालो आहे’, असे सांगितले.

कर्नाटकातील काँग्रेस सरकार हिंदुविरोधी ! – टी. राजा सिंह

कर्नाटक सरकारने घातलेल्या बंदीविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना आमदार टी. राजा सिंह यांनी त्यांनी कर्नाटक सरकारला ते हिंदुविरोधी असल्याचे म्हटले आहे.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News