Menu Close

अयोध्येत ‘कोका कोला’ आस्थापनातील कर्मचार्‍यांच्या मनगटावरील लाल दोरे बलपूर्वक कापले

यापूर्वीही स्व. राजवी दीक्षित यांनी ‘कोका कोला’चे दुष्परिणाम उघड करून त्याचे खरे स्वरूप समाजासमोर आणले होते; परंतु आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारने कोका कोलावर काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे कोका कोलाची येथपर्यंत मजल गेली. हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! सरकार आता तरी या विदेशी आस्थापनावर देशात बंदी घालेल का ? – संपादक 

अयोध्या (उत्तरप्रदेश) : येथे स्थित असलेल्या ‘अमृत बॉटलर प्रायव्हेट लिमिटेड’ या कोका कोला या शीतपेय बनवणार्‍या आस्थापना कारखाना असलेल्या ठिकाणचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. त्यामध्ये आस्थापनातील हिंदु कर्मचार्‍यांच्या मनगटावरील लाल दोरे बलपूर्वक कापून त्यानंतरच त्यांना कारखान्यात प्रवेश दिला जात असल्याचे दिसत आहे. एका वृत्तसंकेतस्थळावर हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘हे कृत्य म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आणि धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे’, असे सांगत कर्मचारी अन् स्थानिक लोक यांनी संताप व्यक्त केला आहे.

सुरक्षा अधिकार्‍यांनी कामगारांना त्यांच्या मनगटावरील दोरे काढून टाकण्याच्या अटीवर कारखान्यात प्रवेश दिल्याचा आरोप होत आहे. ही घटना प्रसारित झाल्यानंतर सामाजिक माध्यमांवर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्याचा निषेध केला आहे. सध्या या घटनेविषयी ‘कोका कोला’ आस्थापनाकडून मात्र अद्यापपर्यंत कुठलाही खुलासा करण्यात आले नाही.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News