Menu Close

स्वत:मधील दुर्गातत्त्व जागृत करून स्वत:च्या शिलाचे रक्षण करण्याची आवश्यकता – कु. श्रद्धा सगर

उपस्थित युवतींना मार्गदर्शन करतांना कु. श्रद्धा सगर (डावीकडे) आणि सौ. सपना बोकडे (उजवीकडे)

सोलापूर (महाराष्ट्र) – परस्त्री मातेसमान असणार्‍या भारताची ओळख ‘बलात्कारांचा देश’ अशी झाली आहे. पाश्चात्त्य विकृती ही आमची संस्कृती झाली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मिनी यांचे शौर्य आपण विसरलो आहोत. महिलेकडे उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. आज पुन्हा हे शौर्य शिकण्याची आणि स्वतःमधील दुर्गातत्त्व जागृत करून स्वतःच्या शिलाचे रक्षण करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या कु. श्रद्धा सगर यांनी केले.

शिबिरासाठी उपस्थित युवती स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे गिरवतांना

२२ सप्टेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवती आणि महिला यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्वसंरक्षण शिबिरात त्या बोलत होत्या. श्रीकृष्ण मंगल कार्यालय कर्णिकनगरजवळ येथे आयोजित शिबिरासाठी ११६ युवती-महिला उपस्थित होत्या. शिबिराचा उद्देश श्री. धनंजय बोकडे यांनी सांगितला, तर हिंदु जनजागृती समितीचे कार्य श्री. लिंगराज हुळळे यांनी सांगितला. या शिबिरात कराटे प्रशिक्षण, स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे प्रकार शिकवण्यात आले.

Related News