-
त्रिपुरामध्ये नवरात्रीच्या देणगीवरून वाद
-
मुसलमानांनी बाजारातील दुकाने लुटली
-
पोलीस आणि निमलष्करी दलाचे सैनिक तैनात
- क्षुल्लक कारणावरून कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन मुसलमानांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या मालमत्तेची हानी करायला त्रिपुरा भारतात आहे कि बांगलादेशात ?
- हिंदूंनी मुसलमानांकडे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देणगी मागितल्यावर त्यांचे पित्त खवळते आणि ते थेट कायदा हातात घेतात. याउलट गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव यांच्या काळात हिंदूंनी काढलेल्या मिरवणुकीवर मुसलमान आक्रमण करत असूनही जन्महिंदू शांत रहातात, हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद !
- त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार असतांना मुसलमानांच्या दहशतीमुळे हिंदूंना भीतीच्या छायेखाली रहावे लागणे, हिंदूंना अपेक्षित नाही ! – संपादक
आगरतळा (त्रिपुरा) – उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील कदमताला येथील सार्वजनिक दुर्गापूजा आयोजकांनी नवरात्रीनिमित्त एका मुसलमानाकडे देणगी मागितल्यावरून येथील मुसलमानांनी हिंदूंची घरे आणि दुकाने यांची तोडफोड केली. ६ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा निर्घृणपणे मृत्यू झाला आणि १७ जण जखमी झाले, अशी माहिती एका वृत्तसंकेतस्थळाने दिली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने येथे प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.
Mu$l!m bigots vandalize and loot the houses and shops of Hindus for asking #Navratri donations in #Tripura
▫️Police and paramilitary forces deployed in the region.
👉 To have such a violent take down for a trivial reason, is Tripura a part of #Pakistan?
👉 On asking for… pic.twitter.com/Cc74kUztFy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 7, 2024
१. एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार कदमताला येथील एका सार्वजनिक दुर्गापूजा आयोजकांनी आसाम येथे जाणार्या एका मुसलमान वाहनचालकाकडे देणगी मागितली. यावेळी त्यांच्यात मोठा वाद झाला. त्यावेळी मुसलमान चालकाच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात मुसलमान जमा झाले आणि त्यांनी दुर्गापूजा आयोजकांच्या घरावर अन् घरातील सदस्यांवर आक्रमण केले. या वेळी मुसलमानांनी हिंदूंनी २ घरे आणि १ ब्यूटी पार्लर यांची तोडफोड केली.
२. कदमताला बाजार परिसरातही जाळपोळ करण्यात आली. सशस्त्र मुसलमान जमावाने हिंदूंना भीती दाखवत बाजारपेठेतील दुकाने लुटली. या आक्रमणात एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली, तर १७ जण घायाळ झाले.
३. या घटनेमुळे येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. या आक्रमणात हिंदूंच्या घरांच्या झालेल्या अपरिमित हानीचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत. या प्रकाराने भयभीत झालेल्या एका हिंदु महिलेने प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, माझ्या घरासमोरील कदमताला बाजार उद़्ध्वस्त झाला आहे. हा भारत आहे का ? आम्ही येथून कुठे जाणार ?
४. या घटनेनंतर येथे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्रिपुरा स्टेट रायफल्स (टी.एस्.आर्.) पोलीस आणि निमलष्करी दल यांना तैनात करण्यात आले. त्यांनी लाठीमार आणि गोळीबारही केला. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत निर्मलेंदू सेन आणि द्विपजॉय नाथ या २ हिंदूंना अटक केली आहे, तसेच प्रशासनाने या परिसरात कलम १६३ लागू केले आहे.
५. कदमताला येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून पोलीस योग्य ती कारवाई करत आहेत. ‘कृपया अफवा पसरवू नये’, असे उत्तर त्रिपुरा पोलिसांनी म्हटले आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी या प्रकरणाची नोंद घेत हिंसाचारात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात