सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथील घटना
अशांवर कठोर कारवाई करून पुन्हा दगडफेक करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही, असा वचक पोलिसांनी निर्माण केला पाहिजे ! – संपादक
सहारनपूर (उत्तरप्रदेश) – गाझियाबादच्या डासना मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानावरून राज्यात अनेक ठिकाणी हिंसक निदर्शन चालू आहेत. या पार्श्वभूमीवर आता सहारनपूर पोलीस चौकीवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. याविषयी पोलिसांनी सांगितले की, जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. दगडफेक करणार्यांवर सीसीटीव्हीचे चित्रण पाहून कारवाई केली जाईल.
Saharanpur (Uttar Pradesh) : Mu$|!m procession against Yati Narsinghanand turns violent, stones pelted on Police Station
Police must crack down on stone-pelters, sending a strong message that violence won’t be tolerated, to prevent future incidents
pic.twitter.com/fU8wZzrCgc— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 8, 2024
यति नरसिंहानंद यांच्यावर कारवाई व्हावी, याचे निवेदन देण्यासाठी मुसलमान मोर्चा काढत शेखपुरा गावातील पोलीस चौकीच्या दिशेने जात होते. ते घोषणाबाजी करत होते. त्याच वेळी मुसलमानांनी चौकीवर दगडफेक केली. यामुळे चौकीतील पोलिसांनी पलायन केले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोचला आणि दगडफेक करणार्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात