हिंदुद्वेषी काँग्रेस सत्तेत असणार्या कर्नाटकमध्ये याहून वेगळे काय होणार ? – संपादक
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – राज्यात दसर्याचा उत्सव चालू झाला असून नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. याच कालावधीत हुब्बळ्ळी येथे समाजकंटकांनी श्री दत्तात्रेय देवाच्या मूर्तीची तोडफोड केली. या घटनेमुळे तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मंदिरात विशेष पूजा चालू होती.
मूर्तीची तोडफोड झाल्याचे लक्षात येताच स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अन्वेषण केले. ‘दोषींवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे. देशपांडेनगरच्या श्री दत्तात्रेय मंदिरातील मूर्तीची तोडफोड झाल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे आमदार महेश टेंगिनकाई म्हणाले की, राज्यात काही लोक उपद्रव करत आहेत आणि धार्मिक सलोखा बिघडवू पहात आहेत.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात