Menu Close

रत्नागिरी – रा.स्व. संघाच्या संचलनाच्या वेळी मुसलमानांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा

  • मुसलमानांवर कारवाई करण्याची हिंदूंची मागणी

  • शेकडो हिंदूंचे पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या आंदोलनानंतर पोलिसांनी चौघांना घेतले कह्यात

  • ‘गंगा जमुनी तहजीब’चा केवळ हिंदूंना उपदेश करणारे धर्मनिरपेक्षतावादी आता या घटनेवरून मुसलमानांना एक चकारही बोलत नाहीत ! यातून मुसलमानांपेक्षा हे धर्मनिरपेक्षतावादीच हिंदूंचे अधिक घातक शत्रू आहेत, असेच म्हणायला हवे ! – संपादक, हिंदुजागृती

रत्नागिरी (महाराष्ट्र) – विजयादशमीच्या पूर्वसंध्येला येथील कोकणनगर परिसरात पोलिसी बंदोबस्तात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाच्या वेळी मुसलमानांनी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्या. यावरून ‘आमच्या धर्मभावना दुखावणार्‍या घोषणा देणार्‍यांवर त्वरित कारवाई करा’, या मागणीसाठी येथील हिंदूंनी पोलीस ठाण्यात आंदोलन केले. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरा चालू झाली. या प्रकरणी पोलिसांनी १२ ऑक्टोबरच्या पहाटे ४ जणांना कह्यात घेतले.

हिंदूंनी आंदोलनाद्वारे केलेल्या मागणीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी नीलेश माईणकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.

१. प्रतिवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने रितसर प्रशासकीय अनुमती घेऊन शुक्रवार, ११ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता सघोष संचलन चालू केले. हे संचलन कोकणनगर, मारुति मंदिर, माळनाका मार्गे रा.भा. शिर्के प्रशालेमध्ये समाप्त होणार होते.

२. पोलिसी बंदोबस्तात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले हे संचलन कोकणनगर येथे आले असता मुसलमान एकत्र आले आणि त्यांनी या संचलनाला अडवण्याचा प्रयत्न करत ‘नारा-ए-तकबीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे), ‘अल्लाहू अकबर’ अशा जोरदार घोषणा दिल्या.

३. संचलनाच्या मार्गावर मुसलमान येत असतांनाच पोलिसांनी प्रथम त्यांना अडवले आणि  मागे सारले.

४. त्यानंतर स्वयंसेवकांनी हे संचलन पूर्ण करून विजयादशमीचा कार्यक्रम शिर्के प्रशाला येथे पूर्ण केला. तेथूनच स्वयंसेवक, सकल हिंदु समाज आणि सर्वत्रचे शेकडो हिंदू संघटित होऊन शहर पोलीस ठाण्यात रात्री साडेनऊ वाजता धडकले.

५. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, रा.स्व. संघाचे प्रवीण जोशी यांच्यासह अनेक नेते शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून बसले होते. या वेळी हिंदूंनी ‘या घोषणा कुणामुळे देण्यात येत होत्या’, याची माहिती पोलिसांना दिली. त्यांना व्हिडिओ दाखवले आणि ‘पोलिसांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी’, अशी मागणी केली.

६. रात्री साडेबारानंतर पोलिसांनी ‘आम्ही संबंधितांना कह्यात घेऊ आणि कारवाई करू’, असे आश्‍वासन दिले; मात्र त्यानंतरही हिंदूंनी आंदोलन चालूच ठेवले. ‘जोपर्यंत ठोस कारवाई केली जात नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही’, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

७. रत्नागिरी जिल्हा पोलीस उपअधीक्षक माईणकर आणि पोलीस निरीक्षक तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ४ जणांना १२ ऑक्टोबरला विजयादशमीच्या पहाटे पोलिसांनी कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर हिंदूंनी आंदोलन थांबवले.

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Related News