पाकची राजधानी इस्लामाबादमध्ये नोव्हेंबरमध्ये होणार्या सार्क परिषदेवर भारत, भूतान, बांगलादेश यांच्या पाठोपाठ अफगाणिस्ताननेही बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यावर ही परिषदच स्थगित करण्यात आली आहे
केंद्र सरकारने यापूर्वी मुसलमानांसाठी सूफी संमेलनाचेही आयोजन केले होते. यात पंतप्रधान मोदी स्वतः सहभागी झाले होते. मात्र सरकारने हिंदूंसाठी म्हणून अद्याप एकही योजना आखलेली नाही.
मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील ठाकुरद्वारा पोलीस ठाण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्या काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
ठाण्यातील सामनाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. आयबीएन लोकमतच्या वृत्तानुसार या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडनं स्विकारली आहे.
उरी येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताकडून पाकमधील आतंकवादी प्रशिक्षणकेंद्रावर आक्रमण होण्याच्या भीतीने पाकने १६-१७ प्रशिक्षण केंद्रे स्थलांतरित केली आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.
मशिदीवरील भोंग्यांतून होणार्या प्रदूषणाच्या संदर्भात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी कोठेही होतांना दिसून येत नाही, असे प्रतिपादन येथील भाजपचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी केले.
२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी सोमवारी न्यायालयाने कर्नल पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबईतील विशेष न्यायालयाने हा निकाल दिला.
१५ ऑक्टोबर रोजी न्यूयॉर्कमध्ये रिपब्लिकन हिंदू युती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत भारतीयांनी सहभागी व्हावे यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न सुरु आहेत.
पाकच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांताचे विधानसभा अध्यक्ष असद कैसर यांनी हिंदु नेते बलदेव कुमार यांना सदस्यत्वाची शपथ देण्यास नकार दिला. तहरीक-ए-इन्साफचे नेते कुमार विधानसभा अध्यक्षांच्या या व्यवहाराच्या…
तमिळनाडूमध्ये ३ पोलिसांनी हवालाचे ३ कोटी ५० लाख रुपये लुटल्याच्या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली. यांपैकी एक जण करूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुथुकुमार असल्याचे…