Menu Close

महाराष्ट्र : अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण !

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याची घोषणा केली.

वाराणसी (उत्तरप्रदेश) : ज्ञानवापीतील श्रृंगार गौरी देवीच्या पूजेच्या संदर्भातील मुसलमान पक्षाची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली

येथील ज्ञानवापीमध्ये असणार्‍या श्रृंगार गौरी देवीच्या नियमित पूजेच्या अधिकाराच्या संदर्भातील ‘अंजुमन इंतजामिया कमेटी’ची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

रांची (झारखंड) मधील ‘मॉडेलिंग’ प्रशिक्षक अख्‍तर याच्‍याविरुद्ध बलात्‍काराचा गुन्‍हा नोंद !

रांची (झारखंड) येथील मॉडेलिंग प्रशिक्षण केंद्राचा संचालक तन्‍वीर अख्‍तर याने बलात्‍कार केल्‍याचा आरोप एका महिला हिंदु मॉडेलने केला. पीडित महिला बिहारमधील भागलपूर येथील रहिवासी आहे.

देश अन् धर्म वाचवण्याविषयी हिंदु बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ होते का ? – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय

‘भारताचे तुकडे होऊ नयेत, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे, हे ‘हेट स्पीच’ आहे का ?’, जर हिंदू ‘आपला देश आणि धर्म वाचवण्याविषयी बोलत असेल, तर ते…

रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती

आपल्याला नवीन राज्य स्थापन करायचे आहे, त्यामुळे आपण रामराज्याविषयी का बोलत नाही ? रामराज्य असेल, तरच न्याय प्रस्थापित होईल, असे विधान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी…

पुजार्‍यांना ‘उघडेबंब’ म्हणणारे छगन भुजबळ यांचे पाद्री, मौलवी यांच्या, तसेच मुसलमान महिलांच्या बुरख्यावर टीका करण्याचे धाडस आहे का ?

छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील विविध मंदिरांनी लागू केलेल्या वस्त्रसंहितेवर टीका करतांना ‘मंदिरातील पुजारी उघडेबंब असतात. त्यांना पूर्ण कपडे घालण्यास सांगा’, अशी हिंदु धर्माप्रती द्वेष दर्शवणारी…

महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणार्‍या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियाना’मध्ये ‘सुराज्य अभियाना’च्या सूचनांचा समावेश !

राज्यात राबवण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून सुचवण्यात आलेल्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंना मजारीची पूजा न करण्याचे आवाहन करणारा फलक पोलिसांनी हटवला !

मुझफ्फरनगर येथील टाऊन हॉल जवळील एका मजारीसमोर राजेश गोयल या व्यक्तीने एक फलक लावला होता. त्याद्वारे ‘हिंदूंनी मजारीची पूजा करू नये’, असे आवाहन करण्यात आले…

अमरावती (महाराष्ट्र) येथील ९ मंदिरांत वस्त्रसंहिता लागू होणार !

अमरावती येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात संमत झालेल्या ठरावानुसार अमरावती येथील ९ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय ३० मे या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत घोषित…

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे सर्कसमधील हिंदु कर्मचार्‍याची हत्या !

जिहादी आतंकवाद्यांनी येथील ‘अम्युझमेंट पार्क’मधील सर्कसमध्ये काम करणार्‍या दीपू नावाच्या एका हिंदु कर्मचार्‍यावर गोळीबार करत त्याची हत्या केली.