Menu Close

भारतापासून काश्मीर तोडून बांगलादेश बनवल्याचा सूड घेऊ ! – हाफीज सईद याचे दिवास्वप्न

बांगलादेशच्या निर्मितीचा सूड घेण्यासाठी आम्ही काश्मीर तोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याही पुढे आम्हाला जायचे आहे, असे फुत्कार हाफीज सईद याने सोडले आहेत.

देव न मानणार्‍या डॉ. पाटणकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करून त्यांच्या हेतूचा तपास करावा ! – बजरंग दल आणि भक्त यांची मागणी

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्‍यात विनासोवळे बळजोरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न पुरो(अधो)गामी डॉ. भारत पाटणकर यांनी १५ डिसेंबरला केला.

प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वज खरेदी-विक्री करणार नाही !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाची खरेदी-विक्री करणार्‍या जिल्ह्यातील ठोक व्यापार्‍यांची एक बैठक घेण्यात आली. यामध्ये व्यापार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देला.

डोंबिवली येथील गावदेवीच्या मुखवट्याची चोरी

डोंबिवली (पूर्व) येथील कचोरेेगाव गावदेवी मंदिराच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोराने २० सहस्र रुपये मुल्याचा अंदाजे अर्धा किलोचा पंचधातूचा मुखवटा चोरून नेला.

विश्‍व हिंदु परिषद हिंदु संस्कृतीचे जतन करील ! – रवींद्र तांबोळकर, विश्‍व हिंदु परिषद, सिंधुदुर्ग

शेकडो वर्षांच्या हिंदु संस्कृतीचा आज र्‍हास होत चालला आहे. कुंकू हे सौभाग्याचे लेणे असून, ते लावणेही बंद होत आहे. असे अनेक दुष्परिणाम हिंदु संस्कृतीवर होत…

आफ्रिकेतील गॅबॉन देशात एका व्यक्तीकडून अल्लाहु अकबर म्हणत दोघा विदेशी पत्रकारांवर चाकूने आक्रमण

गॅबॉनचे संरक्षणमंत्री अँटनी मस्सार्ड म्हणाले की, प्रत्यक्ष साक्षीदारांच्या मते आक्रमण करणारी ५३ वर्षीय नायजेरियन व्यक्ती होती. पोलिसांनी तिला अटक केली आहे.

डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात रेडकॉर्नर नोटीस जारी करण्यास इंटरपोलचा नकार

डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात अजून आरोपपत्र प्रविष्ट नसून नियमानुसार केवळ संशयाच्या आधारे किंवा चौकशीसाठी रेडकॉर्नर नोटीस जारी करता येत नाही, असे इंटरपोलने म्हटले आहे.

महिलेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार : गोल्ड जिमचा मालक शकील शकूर याला अटक

अपहरण आणि बलात्कार या गुन्ह्यांत अगोदरच न्यायालयीन कोठडीत असलेल्या शकीलच्या विरोधात पुणे येथेही तक्रार प्रविष्ट असल्याने मुंबई पोलिसांनी त्याला पुणे पोलिसांच्या कह्यात दिले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये ४ सहस्रांहून अधिक संस्थांमध्ये बालकांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार चर्चच्या अधिकार्‍यांकडे बालकांच्या लौंगिक शोषणाच्या ४ सहस्र ४४४ तक्रारी मिळाल्या होत्या. यातील १५ टक्क्यांहून अधिक आरोप पाद्य्रांवर करण्यात आले होते.

जोगेश्‍वरी-विक्रोळी रस्त्यावरील श्री हनुमान मंदिर पाडले

मंदिरामुळे मार्गावर वाहतुकीची कोंडी होत होती, असे म्हटले जाते. मंदिर पाडण्यासाठी महापालिकेने कारवाई चालू केल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले.