उत्तरप्रदेशमधील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावणे अनिवार्य असल्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतल्यानंतर १३ मे या दिवशी राज्यातील बहुतांश मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावण्यात आले.
उत्तरप्रदेश राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून वर्ग प्रारंभ होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणणे बंधनकारक असणार आहे.
‘‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे. राज्यघटनेत असे काहीही लिहिलेले नाही. हे आमच्या परंपरांच्या विरोधात आहे. यापूर्वीही सदनाच्या आतमध्ये हे गीत कधीच गायले…