Menu Close

हडपसर (जिल्हा पुणे) येथे गणेशोत्सवानिमित्त पार पडला शौर्य जागरण उपक्रम

हडपसर येथील शिवतांडव प्रतिष्ठान मंडळाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित शौर्य जागरण उपक्रम पार पडला. या उपक्रमासाठी धर्मप्रेमी श्री. हितेश अकुल यांनी पुढाकार घेऊन…

धर्मशास्त्र समजल्याने बहुसंख्य हिंदूंनी श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्य यांचे वहात्या पाण्यात केले विसर्जन

यावर्षीही चिपळूण येथील बहादूरशेखनाक्या नजिकच्या वाशिष्टी नदीच्या काठी आणि बाजारपेठेतील नाईक कंपनी पुलानजीकच्या विसर्जन स्थळांवर समितीच्या वतीने श्री गणेशमूर्ती अन् निर्माल्य विसर्जनासंबंधी धर्मशास्त्र प्रबोधन मोहीम…

गणेशोत्सवानिमित्त नागपूर येथेही धर्मजागृतीपर उपक्रम !

शहरात विविध मंडळांमध्ये ‘साधनेचे महत्त्व’, ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ हे व्याख्यानांच्या माध्यमातून सांगण्यात आले. तसेच धर्मशिक्षण देणार्‍या फलकांचे प्रदर्शनही लावले होते.

पुणे येथे भाविकांनी दिले श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास प्राधान्य

प्रतिवर्षीप्रमाणे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी ‘आदर्श गणेशोत्सव’ मोहिमेच्या अंतर्गत पुणे शहर, तसेच पिंपरी-चिंचवड भागांतील विसर्जन घाटांवर प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. समितीचे कार्यकर्ते…

रामनाथ (जिल्हा रायगड) येथे गणेशोत्सवानिमित्त सामूहिक अथर्वशीर्ष पठण

रामनाथ (अलिबाग) येथे गणेशोत्सवाच्या निमित्ताने आदर्श गणेशोत्सव मंडळात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले. या वेळी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गणेशोत्सव काळात नंदुरबार येथे विविध धर्मजागृतीपर उपक्रम !

नंदुरबार शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवण्यात आले. विविध मंडळांमध्ये हिंदु राष्ट्र जागृती सभा, व्याख्याने, प्रवचने, फ्लेक्स प्रदर्शन या माध्यमांतून धर्मशिक्षण आणि साधनेचे,…

सनातनच्या मूर्तीशास्त्राप्रमाणे मूर्ती करण्यास प्रारंभ केल्यावर २५० मूर्तींची मागणी

रायबाग येथील मूर्तीकार श्री. संभाजी कुंभार यांनी १३ वर्षांपूर्वी सनातनच्या मूर्तीशास्त्राप्रमाणे श्री गणेशमूर्ती करण्यास प्रारंभ केला. पहिल्या वर्षी त्यांनी केवळ २ मूर्ती सिद्ध केल्या. सध्या…

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर पुणे येथील औंध घाटावर अयोग्य प्रकारे लावलेले बांबू काढले

औंध येथील विसर्जन घाटावर ७ सप्टेंबर या दिवशी नदीकडे जाणारा रस्ता बांबू बांधून बंद करण्यात आला होता. त्यामुळे अनेक भाविकांना ‘नदीत विसर्जन करण्यास बंदी आहे’,…

आफ्रिका खंडातील घाना देशामध्ये गेल्या ५० वर्षांपासून साजरा होत आहे गणेशोत्सव !

भारतात ज्या प्रकारे मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो, तशाच प्रकारे आफ्रिका खंडातील देश असलेल्या घानामध्येही आफ्रिकी हिंदू तो गेल्या ५० वर्षांपासून साजरा करत आहे.

श्री गणेशमूर्तीचे विडंबन थांबवण्याविषयी हिंदुत्वनिष्ठांचे विलेपार्ले पोलीस ठाण्यात निवेदन !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई येथील एका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकार्‍याने वाहतूक पोलिसाच्या गणवेशातील श्री गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. श्री गणेशमूर्तीचे अशा प्रकारे होणारे विडंबन थांबवावे, अशी मागणी…