७ एप्रिल या दिवशी सकाळी येथील उर्दू शाळेजवळील विजेच्या खांबावरील एक भगवा ध्वज फाडून फेकून दिल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या निर्दशनास आले.
सीएन्एन् वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्यां बिलीव्हर या मालिकेतून रझा अस्लान यांचा हिंदु धर्मावर टीका करणारा कार्यक्रम दाखवल्याप्रकरणी हिंदु अमेरिकन फाऊंडेशनने वाहिनीचा निषेध केला.
हिंदूंनी श्रीरामनवमीच्या दिनी प्रभु श्रीरामचंद्रांची मिरवणूक काढायची म्हटली की, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांना नोटिसा बजावल्या जातात.
अमरावती येथील जेवडनगर भागात नुकत्याच पार पडलेल्या श्रीमद्भागवत कथा सप्ताहात मोहन लांडगे या तथाकथित कीर्तनकाराने साधु-संतांना बलात्कारी म्हटल्याने हिंदुत्वनिष्ठांनी त्यांना चांगलाच चोप दिला.
५ एप्रिलला ऑल इंडिया शिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत देशात गोहत्याबंदी करणे योग्य असल्याचे म्हटले गेले.
नवादा (बिहार) येथे धर्मांधांनी रामनवमीविषयीचे भित्तीपत्रक फाडल्याने दंगल उसळली. या वेळी काही दुकानांना आग लावण्यात आली, तर वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या.
हरोहळ्ळी (बेंगळुरू) येथे सरकारच्या वतीने उभारण्यात येत असलेले पशूवधगृहाचे बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे, माले महादेश्वर टेकडीवर गायींना चरण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी.
प्रतापगडावरील अफझलखान मेमोरिअल ट्रस्टने बांधलेल्या १९ खोल्यांचे बांधकाम पाडण्यात येईल, असे आश्वापसन वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवर यांनी आमच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या चर्चेत दिले होते.
मजलवाडा, हणजुणे येथील ‘मरनेड्स बूटीक’ दुकानाच्या विदेशी महिला मालकिणीने हिंदूंसाठी आदराचे स्थान असलेल्या श्री लक्ष्मीदेवीचे अश्लील आणि विडंबनात्मक चित्र असलेले ‘टॅग’ दुकानातील कपड्यांवर लावले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास कुशलपणे मांडणारे सहस्रो तरुण निर्माण व्हायला हवेत. ते देशाच्या कानाकोपर्यामत जाऊन त्यांचा इतिहास सांगतील.