Menu Close

महाराष्ट्रातील कारागृहांत ‘ज्ञानेश्‍वरी प्रवचन सोहळ्या’चे आयोजन करणार ! – कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय

येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी ‘ज्ञानेश्‍वरी प्रवचन सोहळा’ उपक्रम चालू करण्यात आला. यामुळे कारागृहातील शेकडो कैद्यांचे वागणे, बोलणे आणि विचार यांत अभूतपूर्व सुधारणा झाली.

मेरठ येथे हिंदु असल्याचे सांगून धर्मांधांकडून हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार

मेरठ जिल्ह्यातील शोभापूर येथे रहाणार्‍या एका हिंदु तरुणीला धर्मांधांनी भ्रमणभाषवर संपर्क करून तिला हिंदु असल्याचे सांगितले आणि तिच्याशी मैत्री केली.

राज्यात अ‍ॅट्रॉसिटीच्या २ सहस्र ३००, तर महिलांवरील अत्याचाराच्या १० सहस्रांहून अधिक तक्रारी प्रविष्ट ! – खालिद कैसर

पोलीस महानिरीक्षक खालिद कैसर म्हणाले, राज्यात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याखाली तक्रार प्रविष्ट होण्याचे प्रमाण जवळपास ७ टक्के, महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण २२ ते २३ टक्के आहे.

पोलिसांच्या तावडीतून बलात्कारी धर्मांध आरोपी पळाला

‘मुसळधार पावसामुळे नगरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीचा अपलाभ घेऊन पाथर्डी बलात्कार प्रकरणातील भैय्या उपाख्य मोईन गुलाब शेख या धर्मांध आरोपीने पलायन केले.

राजस्थानमध्ये गोतस्करांच्या गोळीबाराला पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात १ गोतस्कर ठार

ठार झालेल्या गोतस्कराकडून ७.६२ एम्एम्चे देशी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच गोतस्कराच्या मिनी ट्रकमधून ५ गायी सोडवण्यात आल्या.

कोलकाता येथील कारागृहात इसिसचा आतंकवादी मुसाकडून सुरक्षारक्षकाचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न

मुसा याच्यावर कारागृहातच खटला चालवण्यात येत आहे. न्यायालयात नेण्यासाठी त्याच्या खोलीचे दार गोविंद चंद्र डे या सुरक्षारक्षकाने उघडल्यावर मुसाने हे आक्रमण केले.

मोराळे (जिल्हा सांगली) येथील दत्तभक्त भालचंद्र पाटील महाराज यांना अटक

बाबूराव जाधव यांनी श्री. पाटील महाराज यांच्या विरोधात, अंधश्रद्धा पसरवणे, भूत-पिशाच काढून दरबार घेणे, लोकांकडून प्रत्येकी २०० रुपये घेऊन भोंदूगिरी करून फसवणूक करणे, अशा आशयाची…

नाशिक येथे अफझलखानवधाचा फलक पोलिसांनी काढायला भाग पाडले !

नाशिक येथे श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध करतांनाचे चित्र असलेला फलक लावला होता.

जळगाव येथे धर्मांधांच्या तक्रारीवरून महानगरपालिकेने काढलेला अफझलखानवधाचा फलक हिंदुत्वनिष्ठांनी पुन्हा लावला

२६ नोव्हेंबर या दिवशी शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने येथील शिवाजीनगर पुलावर हिंदुत्वनिष्ठांनी लावलेल्या अफझलखानवधाच्या फलकामुळे १५ ते २० धर्मांधांनी जळगाव पोलीस ठाण्यात भावना दुखावल्याची तक्रार केली.

विमानतळ पोलिसांनी वाघोली (पुणे) येथील ‘सनबर्न ११’ या कार्यक्रमाला अनुमती नाकारली

रोहन हवाल यांनी कार्यक्रमाला अनुमती प्राप्त होण्यासाठी १० नोव्हेंबरला विमानतळ पोलीस ठाण्यात अर्ज केला होता; परंतु सुरक्षेच्या दृष्टीने या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्यात आल्याची माहिती विलास…