महामोर्चासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो गड-दुर्ग प्रेमींच्या मागण्यांना यश !
शिवछत्रपती स्थापित हिंदवी स्वराज्याचे अविभाज्य अंग म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने उभे केलेले गड-दुर्ग ! पराक्रमी इतिहासाची साक्ष असलेल्या या गड-दुर्गांकडे आज दुर्लक्ष होत आहे. एकीकडे गड-दुर्गांची दूरवस्था होत असताना त्यांवर षड्यंत्रपूर्वक अतिक्रमणही होत आहे. गडांवर अवैध कबरी, दर्गे आणि मशिदी बांधल्या जात असतांना सरकारचा पुरातत्त्व विभाग मात्र त्यांकडे दुर्लक्ष करत आहे ! आज हे रोखले नाही, तर एक दिवस या गड-दुर्गांचा खरा इतिहास बदलून त्यांचे इस्लामीकरण केले जाईल ! त्यामुळे गड-दुर्ग महामंडळ स्थापून शिवछत्रपतींच्या शौर्याच्या स्मारकांचे रक्षण व संवर्धन व्हायलाच हवे !
यासाठी ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’ आयोजित ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्च्या’त राज्यभरातून गड-दुर्गप्रेमी संघटनांचे 1500 हून अधिक शिवप्रेमी सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील सर्व गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण करण्यासाठी आणि त्यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी स्वतंत्र ‘गड-दुर्ग महामंडळा’ची स्थापना येत्या तीन महिन्यांत करण्यात येईल. ठराविक कालमर्यादा ठरवून सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यात येतील, तसेच उर्वरित सर्व मागण्यांच्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर सर्व दुर्गप्रेमी संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ठोस आश्वासने राज्याचे पर्यटन, महिला आणि बालविकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’च्या सांगतेच्या वेळी दिली.
महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समितीच्या प्रमुख मागण्या
राज्यातील सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे ठराविक वेळमर्यादा घालून हटवा !
अतिक्रमणास कारणीभूत असलेले प्रशासकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करा !
गड-दुर्गांवर अतिक्रमण करणार्यांचे पुनर्वसन शासकीय खर्चाने करू नका !
‘महाराष्ट्र गड-दुर्ग संवर्धन महामंडळ’ स्थापन करून गड-दुर्गांचे संवर्धन करा !
महामोर्च्याची क्षणचित्रे
View Gallery
छत्रपती शिवाजी महाराजांनी आई भवानी आणि गुरु यांचा आशीर्वाद; शौर्य, पराक्रम, गनिमीकाव्याची युद्धनीती आदी स्वकर्तृत्व; तसेच महाराजांवर अतूट निष्ठा असलेल्या मावळ्यांच्या त्यागातून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० पेक्षा अधिक ऐतिहासिक दुर्ग बांधले आणि काही दुर्ग जिंकून घेतले. गड-दुर्गांचे महत्त्व केवळ ऐतिहासिक नाही, तर ते हिंदु राजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. आज मात्र या गड-दुर्गांचे षड्यंत्रपूर्वक इस्लामीकरण केले जात आहे. कित्येक गड-दुर्गांवर आज अनधिकृत थडगी, मजार, दर्गा, मशिदी बिनदिक्कतपणे उभ्या रहात असतांना त्याकडे कानाडोळा करतो. जे गड-दुर्ग परकीय आक्रमकांच्या तोफांनाही अभेद्य राहिले, ते गड-दुर्ग पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेमुळे आज एकप्रकारे ‘लँड जिहाद’चा बळी ठरत आहेत. हिंदूंनो, आपल्या क्षेत्रातील श्रद्धास्थाने, गड-कोट यांवर झालेल्या आक्रमणांविषयी, यांची झालेली दुरावस्था, स्वच्छतेविषयी अनास्था यांच्या विरोधात आवाज उठवून त्यांच्या रक्षणासाठी कटीबद्ध व्हा !
Sign Petition
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे आदी बांधून होणारी अतिक्रमणे तात्काळ हटवावी !
Request you to please send the email with this demand to Hon’ble Chief Minister, Cultiral Minister of Maharashtra and Director General, Archaeological Survey of India by clicking on the below button. Request you to send a copy of the email to contact@hindujagruti.org
(Note: ‘Send Email’ button will work only on Mobile)
गड-दुर्ग रक्षणासाठी समितीचे कार्य
- महाराष्ट्रातील गडदुर्गांचे संवर्धन करण्याचे, तसेच त्यावरील अतिक्रमणे हटवण्याविषयी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी गडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी असे प्रशासनाला आदेश दिले.
- गड-किल्ले यांवरील अतिक्रमण काढून त्यांचे संवर्धन करण्याविषयी २२ ऑगस्ट २०२२ या दिवशी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. त्यावेळी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाल्यावर बैठक आयोजित करून निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
- विशाळगड येथील अतिक्रमणाविषयी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने त्यांची २४ ऑगस्ट २०२२ या दिवशी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री एस्.पी. सिंग बघेल यांना निवेदन दिले. त्या वेळी त्यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करू आणि निर्णय घेऊ हे आश्वासन दिले.
- हिंदु जनजागृती समितीच्या पाठपुराव्यानंतर जळगाव येथील पेशवेकालीन आणि ऐतिहासिक पारोळा गडाच्या संवर्धनासाठी जिल्हाधिकार्यांनी बैठक घेतली. संवर्धन करण्यासह गडाचे पावित्र्य भंग करणार्यांवर गुन्हे नोंदवण्याचे जिल्हाधिकार्यांचे प्रशासनाला निर्देश दिले.
- विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणांच्याविषयी हिंदु जनजागृती समितीने स्थानिक शिवप्रेमी संघटनांना एकत्र करून विशाळगड अतिक्रमणविरोधी समिती स्थापन केली. या अतिक्रमणविरोधी समितीच्या माध्यमातून ‘विशाळगडावरील अतिक्रमण रोखा’ ही मोहीम चालू केली. त्या अंतर्गत अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. पुरातत्व विभागाच्या अधिकार्यांना भेटून निवेदने देण्यात आली. सोशल मिडिया, ट्विटर ट्रेंड या माध्यमांतून जागृती करण्यात आली. परिणामी जिल्हाधिकार्यांना विशाळगडावरील अतिक्रमण तोडण्यासाठी नोटीस काढावी लागली. जोपर्यंत हे अतिक्रमण पूर्णपणे काढले जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू रहाणार आहे.
- हिंदु जनजागृती समितीने गडकोट संवर्धन मोहिमेच्या अंतर्गत राबवलेल्या विजयदुर्ग किल्ला संवर्धन मोहिमेची नोंद आमदार नितेश राणे यांनी घेत समितीच्या येथील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर समिती च्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन यांना हिंदु जनजागृती समितीने हाती घेतलेल्या राज्यातील ‘गडकोट संवर्धन मोहिमे’ची माहिती दिली, तसेच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी निवेदन देऊन स्थानिक आमदार म्हणून याविषयी पाठपुरावा करावा, अशी विनंती करण्यात आली.
- महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण संवर्धनासाठी ठिकठिकाणी हिंदु जनजागृती समितीकडून लोकप्रतिनिधींना निवेदने देण्यात आली.
समितीला आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मिळालेले यश
- प्रतापगड किल्ल्यावरील अफझलखानाच्या थडग्याभोवती केलेले बेकायदेशीर बांधकाम तात्काळ पाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड युद्धात केलेला पराक्रमाचे एक शिल्पा बनवावे, तसेच अफझलखानाच्या कबरीच्या भूमीला ‘शिवप्रतापभूमी’ असे नाव देण्यात यावे या मागणीचे निवेदन समिती आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी मुख्यमंत्री यांना निवेदन दिले होते. गेले अनेक वर्षे न्यायालयाने आदेश देऊनही अफझलखानाच्या कबरी भोवतीचे अनधिकृत बांधकाम पाडले गेले नाही. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षे प्रलंबित असलेला अफझलखानाच्या कबरीजवळ झालेले अनधिकृत बांधकाम अफजलखानाचा वधाच्या म्हणजेच ‘शिवप्रतापदिना’च्या निमित्ताने (१० नोव्हेंबर २०२२ या दिवशी) महाराष्ट्र सरकारने हे अनधिकृत बांधकाम पाडण्यास घेतले.
- वाई (जि. सातारा) तालुक्यातील ऐतिहासिक ‘किल्ले वंदनगड’चे नाव पालटून ‘पीर किल्ले वंदनगड’ असे करत इतिहास पालटण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने तत्परतेने मा. मुख्यमंत्री, पुरातत्व विभाग आणि वन विभाग यांना निवेदन देत हा गंभीर विषय उघडकीस आणला. तसेच किल्ल्याचे नाव ‘किल्ले वंदनगड’ असेच नाव राहिले पाहिजे, अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार वाई (जि. सातारा) वनपरिक्षेत्र अधिकारी एस्.एस्. मगर यांनी ‘वनविभागाकडून कधीही ‘किल्ले वंदनगडा’चे नाव पालटण्यात आले नाही आणि यापुढे पालटण्यात येणारही नाही’, अशी लेखी हमी पत्राद्वारे हिंदु जनजागृती समितीला दिली.