सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी
‘सुराज्य अभियान’
सामाजिक दुष्प्रवृत्ती रोखूया, सुराज्य स्थापूया
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून वर्ष २०१७ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी ‘सुराज्य अभियान’ चालू केले. हिंदु राष्ट्र यावे’, अशी आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे. आपल्या पूर्वजांनी इंग्रजांविरूद्ध लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले, पण स्वातंत्र्य म्हणजे हिंदु राष्ट्र नाही. ‘सुराज्य’ ही एक महत्त्वाची संकल्पना आहे ! स्वराज्य आले पण सुराज्यही यायला पाहिजे ! ‘स्वराज्य, सुराज्य आणि आध्यात्मिक संकल्पनेच्या आधारावरील शासन व्यवस्था; या तिन्ही गोष्टींचा संगम म्हणजे हिंदु राष्ट्र’. आज सर्वत्र होत असलेल्या भ्रष्टाचाराविषयी सर्व जण अप्रसन्न आहेत; पण त्याविषयी काय करता येईल, हे सर्वांनाच ठाऊक नसल्यामुळे ते अडकतात आणि भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग बनतात. शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील गैरप्रकारांविरुद्ध घटनात्मक पद्धतीने लढा देणे आणि जनजागृती करणे, तसेच सर्वसामान्य जनतेला यासाठी दिशा देणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
‘सुराज्य अभियाना’ अंतर्गत राबवत असलेले उपक्रम
रेल्वेस्थानकांवरील नादुरुस्त ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’पुन्हा सुरु करण्याविषयी अभियान
‘रेल नीर’
विक्रेत्यांकडून अधिक दर आकारण्याविरोधात अभियान
अन्य अभियान
जलप्रदूषणाविषयी ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’कडे याचिका
राज्य महामार्गांवर (NH4A) सुरक्षा निर्देशकांच्या अभावाबाबत पत्रव्यवहार
सर्वच ठिकाणी Maximum Retail Price (कमाल किरकोळ किंमत) प्रमाणे दर आकारले जावेत, याबाबत जागृती अभियान
आपल्या परिसरात होत असलेल्या गैरप्रकारांच्या विरोधात
वैध मार्गाने लढा द्यायला आरंभ करा !
: 9867558384
विविध क्षेत्रातील दुष्प्रवृत्तींची उदाहरणे
लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढा देण्यासाठी पुढील मार्ग वापरा !
माहितीच्या अधिकाराचा वापर करा !
तक्रारी आणि निवेदने यांद्वारे आपल्या मागण्या
संबंधितांपर्यंत पोहोचवा !
पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवा !
जनआंदोलने आणि निदर्शने करा !
जनहित याचिकांद्वारे न्यायालयीन मार्गाने लढा द्या !
सामाजिक क्षेत्रातील आपले परिचित आदींना भेटून त्यांना समितीच्या कार्याची माहिती द्या
सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी समितीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्काचे आयोजन करा !
ग्राहकाचे अधिकार, माहिती अधिकार कायदा तसेच अन्य विषयांची व्याख्याने आयोजित करा
भ्रष्टाचार विरोधात कार्य करणाऱ्यांसाठी शिबिरे आदींचे आयोजन करा
‘सुराज्य अभियाना’च्या कार्यासाठी धन अर्पण करा !
सोशल मिडिया द्वारे जनजागृती करा