करदर्शन

दोन्ही हातांची ओंजळ करून त्यामध्ये मन एकाग्र करून पुढील श्लोकम्हणावा.
कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविंदः प्रभाते करदर्शनम् ।।
अर्थ : हाताच्या अग्रभागी लक्ष्मी वास करते. हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे अन्मूळ भागात गोविंद आहे; म्हणून सकाळी उठल्यावर आधी हाताचे दर्शन घ्यावे.
(पाठभेद : हाताच्या मूळ भागात ब्रह्मा आहे.)
 
प्रातःकाळी उठल्यावर करदर्शन घेत ‘कराग्रे वसते लक्ष्मीः …’ हा श्लोक म्हणणे,म्हणजे स्वतःतील ईश्वराला पहाणे : हिंदु धर्मामध्ये ‘अयम् आत्मा ब्रह्म ।’ म्हणजे‘आत्मा हाच ब्रह्म’, हे शिकवण्यात येते. ‘कराग्रे वसते लक्ष्मीः ….’ हा श्लोक याचेचउदाहरण आहे. त्यामुळे प्रातःकाळी उठल्यावर करदर्शन घेत तो श्लोक म्हणणे म्हणजेस्वतःतील ईश्वराला पहाणे होय.