हिंदुस्थानातलेच नव्हे, सार्या जगातले वातावरण आतंकवादाने दूषित बनले आहे. या दूषित वातावरणाची आणि सूक्ष्म जगताची शुद्धी करण्यासाठी यज्ञाहून श्रेष्ठ दुसरी गोष्ट नाही. वातावरण दूषित झाल्याने कुठे कोरडा दुष्काळ, कुठे ओला दुष्काळ, कुठे महापुराचा प्रलय, तर कुठे रोगराईचा प्रभाव आहे. सर्व जगात युद्धाचे ढग आहेत.
जागोजागी द्वेष, स्वार्थ आतंकवाद, गुन्हेगारी, तस्करी, आणखी अशाच घृणास्पद आणि भयावह गोष्टी घडत आहेत. वातावरण दूषित झाल्याने या सर्व गोष्टींना ऊत आला आहे. वातावरणाद्वारे त्यांना प्रेरणा लाभते. पिके उत्तम येत नाहीत. माणसांना सुखशांती मुळीच नाही. वायूमंडळसुद्धा दूषित आहे. संततीवर त्याचा घातक परिणाम होत आहे. रोगी, दुष्ट आणि पतित स्वभावाची प्रजा जन्माला येत आहे. आंधळी-पांगळी मुले जन्माला येत आहेत.
वातावरणाचा, वायूमंडळाचा, विकिरणाचा प्रभाव सार्या जगावर पसरला आहे. यावर पुस्तकी उपाय, शस्त्रास्त्रे वा मानवी पुरुषार्थ, भौतिक पुरुषार्थ उपयोगाचा नाही, तर आध्यात्मिक पुरुषार्थ हीच यावर यशस्वी उपाययोजना होऊ शकते. आध्यात्मिक पुरुषार्थात यज्ञाचा फार महिमा गायिला गेला आहे. गायत्री यज्ञाने नवे दृश्य निर्माण करण्यासाठी शक्ती उत्पन्न होते. त्या शक्तीने वातावरणातील सारी घाण स्वच्छ होते. ही स्वच्छतेची आणि पवित्रीकरणाची शक्ती फक्त यज्ञातच आहे. यज्ञाद्वारे तुम्ही सर्व जगाची सेवा करू शकता.
लंकादहन आणि विजय यानंतर राक्षस तर ठार झाले; पण वातावरण तसेच घाण होते. त्यांचे निवारण कसे व्हावे आणि वातावरणाचा सामना कसा करावा, यासाठी श्रीरामचंद्रांनी १० अश्वमेध यज्ञ केले. कौरवांच्या काळात कंसापासून जरासंधापर्यंत ज्यांनी ज्यांनी अन्याय-अत्याचार केले, ते सर्व महाभारतात मारले गेले. तथापि वातावरणातील घाण मात्र तशीच राहिली.त्यात दुष्टता भरली होती. तिचे शमन कसे व्हावे, याचा एकच उपाय भगवान श्रीकृष्णाने सांगितला, ‘‘यासाठी यज्ञ केले पाहिजेत.’’ राजसूय यज्ञ त्याचसाठी केला होता. वातावरणाचे शुद्धीकरण हाच यज्ञाचा उद्देश होता.’ – आचार्य श्रीराम शर्मा,