१. वनस्पती : ‘सजीव प्राणी प्राणवायू घेतो आणि कार्बाम्लयुक्त (दूषित) वायू बाहेर टाकतो. हा दूषित वायू वातावरणात नेहमी जास्त प्रमाणात राहू नये; म्हणून वृक्ष-वेली कार्बाम्लयुक्त वायूचे भक्षण करतात आणि प्राणवायू बाहेर टाकतात. तुळस मोठ्या प्रमाणात प्राणवायूचे प्रसारण करते. वृक्षांपासून पाऊस पडायला मदत होते.
२. गाय : गायीपासून बाहेर पडणारे तत्त्व शुद्ध असते; म्हणून गायींना संरक्षण देऊन त्यांचे पालन आणि वर्धन करायला सांगितले आहे. गायीचे शेण आणि गोमूत्र वातावरण शुद्ध करते.
३. पृथ्वी : पृथ्वीवरील मातीसुद्धा वातावरणशुद्धीचे काम करते.
४. जल : जलतत्त्व शुद्धीकरणाचे काम करते.
५. अग्नी : पंचमहाभूतामध्ये अग्नीतत्त्व हे दूषिताला नाहीसे करून वातावरण शुद्ध स्वरूपात ठेवते.
६. आकाश : आकाशाचा व्याप मुद्दाम विशाल स्वरूपात ठेवला आहे, ज्यामुळे पृथ्वीवरून जाणारा दूषित वायू वर गेल्यावर, तो त्यात सामावून जाऊन वातावरण शुद्ध रहाते.’
– प.पू. परशराम पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
पृथ्वीतत्त्व, अग्नीतत्त्व आणि वायूतत्त्व यांत प्रदूषण दूर करण्याची क्षमता असणे !
पृथ्वीतत्त्व, अग्नीतत्त्व आणि वायूतत्त्व प्रदूषण दूर करतात. विष्ठामूत्रादी जी घाण आहे, ती भूमी आत्मसात करते. उरलेले प्रदूषण अग्नी आणि वायू नष्ट करतात.
– डॉ. गुरुदेव काटेस्वामीजी, साप्ताहिक सनातन चिंतन