‘गेल्या काही वर्षांपासून शत्रूपक्षाला हतबल करण्यासाठी त्याची नैसर्गिक साधनसंपत्ती कह्यात घेण्यासोबतच तेथील पर्यावरणाचाही एखाद्या शस्त्रासारखा वापर केला जात आहे !
व्हिएतनामचे दाट रान आणि शेत यांवर धान्य नष्ट करण्यासाठी आणि रान उजाड करण्यासाठी विषारी औषधांची फवारणी अमेरिकेकडून केली गेली. तेथील हवामानात पालट करून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न केले गले !
पुढील प्रकारे ‘पर्यावरणीय युद्धतंत्रा’ने भविष्यात प्रचंड असा मानवी संहार होऊ शकतो –
अ. शत्रूच्या प्रदेशावर उल्कांचे मार्ग पालटून त्यांचा वर्षाव केला जाऊ शकतो.
आ. शत्रूप्रदेशाच्या आकाशातील ‘आयनोस्फियर’मध्ये बिघाड करून त्याची संदेशवहन यंत्रणा विस्कळीत करता येऊ शकेल.
इ. नद्यांचे प्रवाह पालटले जातील. जेणेकरून शत्रूला पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा भासू शकेल.
ई. शत्रूच्या प्रदेशातील नद्या आणि सागर यांच्यात रासायनिक किंवा अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांनी विष मिसळता येऊ शकेल.
उ. शत्रूच्या सागर किनार्याजवळील समुद्रातील विद्युत चुंबकीय तत्त्वांमध्ये पालट करून भूचुंबकीय आकर्षणामुळे प्रचंड लाटा निर्माण करून शत्रूच्या किनार्यावरील धक्के आणि महत्त्वाची ठिकाणे यांची नासधूस करता येईल.
ऊ. नवी रसायने अणूप्रकल्प, खनिज तेल विहिरी आणि मोठी धरणे ही भविष्यकाळातील पर्यावरणीय युद्धतंत्रातील मोक्याची स्थाने असणार आहेत.
– आर्थर वेस्टिंग, युद्धतंत्र आणि पर्यावरण तज्ञ.