शाळेच्‍या डब्‍यातून घरचे पदार्थ न्‍यावेत !

आजकाल मुलांना शाळेत डबा न्यायला लाज वाटते. त्यापेक्षा विकतचे पदार्थ खाण्याकडे अधिक कल असतो. पुढील लेखात शाळेच्या डब्याविषयी काही सूचना पाहूया !

१. शाळेच्या डब्यातून घरचे पदार्थ न्यावेत

मुलांनो, दुकानात मिळणारे केक, बिस्किटे, वेफर्स, चिप्स इत्यादी खाद्यपदार्थ त्यांच्या निर्मितीनंतर बराच काळ तसेच रहातात, तसेच ते पदार्थ भेसळयुक्त असण्याचीही शक्यता असते; म्हणून अशा पदार्थांतून अल्प पोषणमूल्ये मिळतात. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे असे पदार्थ शाळेच्या डब्यातून नेऊ नयेत. घरी बनवलेली पोळी-भाजी, शिरा, पोहे आदी पदार्थ ताजे, तसेच निर्भेळ असल्याने अशा पदार्थांतून अधिक पोषणमूल्ये मिळतात. या व्यतिरिक्त आईच्या हातचा प्रेमळपणा या पदार्थांत उतरतो, त्याचे मू्ल्यच करता येणार नाही ! यामुळे शाळेच्या डब्यातून घरचेच पदार्थ न्यावेत.

२. डबा खाण्याविषयी काही सूचना

अ. डब्यातील पदार्थ खाण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवावेत.

आ. डबा उघडून कुलदेवतेला किंवा उपास्यदेवतेला ‘हे अन्न, तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद म्हणून ग्रहण करत आहे’, अशी प्रार्थना करावी. त्यानंतर डबा खाण्यास आरंभ करावा.

इ. एखाद्या वेळी एखाद्या विध्यार्थ्याने डबा आणला नसल्यास त्याला स्वतःच्या डब्यातील काही भाग द्यावा.

ई. डब्यातील सर्व पदार्थ संपवावेत.

उ. अन्नकण खाली सांडू नयेत. चुकून खाली सांडलेले अन्नकण उचलून कचरापेटीत टाकावेत.

ऊ. पाणी पिऊन हात आणि तोंड धुवावे.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी

३. शरिरावर विपरीत परिणाम करणाऱ्या `फास्ट फूड’ ऐवजी घरातील सात्त्विक आणि पौष्टीक आहार घ्या !