अ. शाळा सुटल्यावर थेट घरी यावे. वाटेत रेंगाळू नये. काही कारणाने विलंब होणार असल्यास तसा निरोप द्यावा अन्यथा आईला काळजी वाटते.
आ. शाळेतून घरी येतांना वाटेत टिंगलटवाळी किंवा एकमेकांना धक्काबुक्की करू नये.
इ. शाळेतून येतांना ‘चीप्स’, चॉकलेट इत्यादी पदार्थ खात खात येऊ नये.
ई. शाळेतून यायच्या वाटेवर दुकान असल्यास दूध, भाजी इत्यादी आवश्यक पदार्थ घरी घेऊन जावेत, म्हणजे आईला साहाय्य होईल.
उ. घरी आल्यावर चपला काढून व्यवस्थित ठेवाव्यात. वह्या-पुस्तके योग्य ठिकाणी ठेवावीत. हात-पाय आणि तोंड धुवावे.
ऊ. शाळेचा गणवेश (युनिफॉर्म) काढून दुसरे कपडे घालावेत.
ए. आईला विचारून अल्पाहार किंवा अन्य खाऊ खावा.
ऐ. शाळेचा डबा स्वतःच घासून आणि पुसून ठेवावा.
मुलांनो, वरीलप्रमाणे छोट्या छोट्या कृती आचरणात आणून आई-वडिलांचे ‘गुणी बाळ’ बना !