‘न्यूयॉर्क सिटी युनिव्हर्सिटी’ येथील यॉर्क महाविद्यालयाने ‘रामायण’ हे महाकाव्य अभ्यासाचा विषय म्हणून घेण्याचे ठरवले आहे. रामायणातील मानवी मूल्यांचा येथे अभ्यास केला जाणार आहे. डॉ. मरसिया कीझ आणि डॉ. चेरिल स्मिथ यांनी न्यूयॉर्क येथे झालेल्या २१ व्या आंतरराष्ट्रीय ‘रामायण परिषदे’ला हजेरी लावली. ‘रामायण’ हे महाकाव्य देश, धर्म, जात यांच्या सीमा भेदून सर्वांच्याच मनाला भावत असल्याचे त्यांना या वेळी दिसून आले.
यामुळे रामायणाचा समावेश न्यूयॉर्क विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. रामायण परिषदेच्यावेळी रामायणावर आधारित नृत्यनाटिका अमेरिकन कलाकारांनी सादर केली. आंतरराष्ट्रीय रामायण परिषदेत देश-विदेशांतील रामायणाच्या अभ्यासक्रमांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ‘रामायण’ या महाकाव्यावर चर्चा केली. या परिषदेला ‘त्रिनिदाद’चे माजी पंतप्रधान श्री. बासदेव पांडे उपस्थित होते. त्यांनी रामराज्य आणि सध्याचे प्रशासन या विषयावर भाषण केले. ‘रामायण’ या महाकाव्याची भुरळ सर्वांनाच पडत असल्याने या महाकाव्याचा समावेश अमेरिकन विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. रामायणाची हीच ताकद आहे, अशी प्रतिक्रिया रामायण परिषदेचे अध्यक्ष श्री. लल्लनप्रसाद व्यास यांनी व्यक्त केली.’
संदर्भ :दैनिक सनातन प्रभात