अभ्यासाला बसण्याच्या ठिकाणी देवतांची चित्रे ठेवावीत

         श्री गणपति, श्री सरस्वतीदेवी आणि कुलदेवता / उपास्यदेवता यांची चित्रे किंवा यांपैकी उपलब्ध असेल, त्या देवतेचे चित्र अभ्यासाच्या पटलावर अथवा अभ्यासाच्या खोलीत ठेवावे. देवतेचे चित्र समोर ठेवून तिच्या चरणांकडे पहात प्रार्थना आणि नामजप केल्याने मन लवकर एकाग्र होते.

१. देवतांच्या चित्रांसमोर सात्त्विक उदबत्ती लावावी

         उदबत्तीच्या सुगंधामुळे वातावरणाची आणि मनाची शुद्धी होते, तसेच वातावरणात ईश्वरी चैतन्य पसरून प्रसन्नता जाणवते. त्यामुळे मन उत्साही रहाते आणि मनाची एकाग्रताही टिकून रहाते.

२. प्रार्थना करावी

अ. अभ्यासाला प्रारंभ करण्यापूर्वी विद्येशी संबंधित देवता श्री गणपति आणि श्री सरस्वतीदेवी यांना प्रार्थना करावी, ‘अभ्यास चांगला होण्यासाठी मला बुद्धी द्या आणि मी करणार असलेल्या अभ्यासाचे मला नीट आकलन होऊ दे.’

आ. अभ्यास करतांना मध्ये मध्ये कुलदेवतेला / उपास्यदेवतेला प्रार्थना करावी, ‘माझा अभ्यास एकाग्रतेने होऊ दे.’

इ. अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी दहा मिनिटे नामजप करावा : प्रार्थनेनंतर अभ्यासात एकाग्रता साधण्यासाठी १० मिनिटे कुलदेवतेचा किंवा उपास्यदेवतेचा नामजप करावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment