गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण श्रीकृष्णाचा पाळणा ऐकणार आहोत. हे गीत प्रत्यक्ष ऐकण्यापूर्वी त्यासंबंधी काही माहिती घेणे उपयुक्त ठरेल.
पाळणा गीताचे वैशिष्ट्य
गीत गातांना गायकाच्या भावाप्रमाणेच गीतामधील शब्दांचा उच्चार, शब्द म्हणण्याची गती, शब्द जोडून म्हणणे किंवा वेगवेगळे म्हणणे इत्यादींवर शब्दांतून निर्माण होणारी सात्त्विकता आणि चैतन्य अवलंबून असते. हे समजण्यासाठी नादशास्त्राचे ज्ञान असण्याबरोबरच सूक्ष्म अभ्यास, म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील कळण्याची क्षमता असणेही आवश्यक ठरते.
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे ।।धृ।।
हृदय वृंदावन पाळण्यामाजी निजरे कृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे ।।धृ।।
भक्तीतंतूचा मृदू शेला पांघरविते तूजला
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे ।।धृ।।
प्रेमदोरीने पाळणा हालविते श्रीकृष्णा
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे ।।धृ।।
एका जनार्दनी गायिला श्रीकृष्ण आळविला
जो जो जो जो रे,
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे ।।धृ।।
श्रीहरि उन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे ।।धृ।।
जो जो जो जो रे ।।धृ।।
जो जो जो जो रे ।।धृ।।