मित्रांनो, गणपति हे आपले आराध्य दैवत आहे. गणपति बुद्धीदाता असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवनात त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. आपण गणपतीची पूजा करतो. ही देवता आपल्याला ज्ञान आणिआनंद प्रदान करते, तसेच मानवाला दैनंदिन कार्य करण्यासाठी लागणारी प्राणशक्तीही तोच आपल्याला प्रदान करतो. मित्रांनो, गणपतिविना आपण काहीच करू शकणार नाही. मग अशा देवतेचे विडंबन झालेलेआणि त्याची विटंबना झालेली आपल्याला आवडेल का ? ही देवता म्हणजे आपल्या सर्वांची आईच आहे.मित्रांनो, आपण आपल्या या देवतेचे विडंबन कदापीही सहन करायचे नाही.
या गणेशोत्सवात जे कोणी गणपतीची विटंबना करतील, त्यांना आपण त्यापासून परावृत्त करायला हवे, तरच आपल्यावर खर्या अर्थाने गणपतीची कृपा होईल.
१. विविध माध्यमातून होणारे गणपतीचे विडंबन आणि ते टाळण्यासाठी करायचे उपाय
१ अ. गणपतीचे चित्र असलेले पुष्टीपत्र (पॅड) लिखाणासाठी वापरणे : आजकाल मुले परीक्षेला जातांना गणपतीचे चित्र असलेले पुष्टीपत्र (पॅड) वापरतात. जिथे गणपतीचे चित्र आहे, तिथे त्या देवतेचेअस्तित्व आहे. मग मित्रांनो, गणपति खाली आणि त्याच्यावर आपण उत्तरपत्रिका लिहिणार, ते पॅड कसेही,कोठेही ठेवणार. मग यामुळे आपल्याकडून त्या देवतेचा अपमान नाही का होणार ? मित्रांनो, आपण गणपतीच्या जागी आपली आई किंवा बाबा यांचे छायाचित्र ठेवू का ? नाही ना ? उलट आपण उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी गणपतीला नमस्कार करून प्रार्थना करायला हवी. मित्रांनो, ही होणारी विटंबना आपण थांबवायलाच हवी. हेच गणपतीलाही आवडेल.
१ आ. गणपतीचे चित्र असलेले टी-शर्ट वापरणे : मित्रांनो, प्रत्येक वस्तूला आपण योग्य त्याठिकाणीच ठेवतो. देवतेचे स्थान सर्वांत चांगल्या ठिकाणी म्हणजे देवघरात असते, तर अशा देवतेचे चित्रटी-शर्टवर छापायचे का ? हे आपल्याला योग्य वाटते का ? आपण आपले कपडे इतस्ततः टाकतो. टी-शर्ट धुतांना त्याला कसेही आपटतो, ब्रशने घासतो. मित्रांनो, जिथे देवाचे चित्र आहे, तिथे त्या देवतेचेअस्तित्वही आहेच ना. मग गणपतीला ब्रशने घासणे, तसेच त्याला कुस्करणे असे करणे म्हणजे आपणआपल्या आवडत्या गणपतीची केलेली घोर विटंबनाच आहे. मित्रांनो, आपण त्या पापाचे भागीदार होणारका ? नाही ना, तर आपण आपल्या मित्रांचे प्रबोधन करण्याचा निश्चय करायला हवा.
१ इ. चित्रकला म्हणून कार्टूनस्वरूपात गणपतीचे चित्र रेखाटणे किंवा अर्धवट चित्र काढणे :आजकाल मुले चित्रकलेच्या नावाखाली कार्टूनच्या रूपात गणपतीचे चित्र रेखाटतात. तसेच गणपतीच्यामूर्तीचा प्रत्येक भाग वेगवेगळा दाखवून चित्र काढतात किंवा केवळ गणपतीचा मुखवटा असलेलेच चित्रकाढतात. मित्रांनो, आपण स्वतःचे असे अर्धवट चित्र काढू का ? कोणतेही चित्र पूर्ण असल्यासच त्यातूनत्या देवतेची शक्ती प्रक्षेपित होते. असे अर्धवट चित्र असल्यास त्यातून वाईट स्पंदने येतात. मित्रांनो,समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या आईचे असे अर्धवट चित्र काढायला सांगितले, तर आपण काढू का ?
१ ई. रांगोळी म्हणून कार्टूनस्वरूपात गणपतीचे चित्र काढणे : काही मुली रांगोळीच्या स्पर्धेत भागघेतात आणि रांगोळी म्हणून गणपतीचे चित्र रेखाटतात. कार्टूनस्वरूपात किंवा मूर्तीचे अवयव वेगवेगळेअसलेली रांगोळी काढतात. मित्रांनो, गणपति ही रांगोळी काढायचे शोभेचे चित्र आहे का ? आपला देवतांविषयीचा भक्तीभाव अल्प झाल्याचे हे लक्षण आहे. याने आपल्यावर गणपतीची कृपा होईल का ?नाही ना ? मित्रांनो, आपण हे सर्व थांबवायला हवे, तरच गणपति आपल्याला आशीर्वाद देईल. या गणेशोत्सवामध्ये अशी रांगोळी काढलेली आढळल्यास संबंधित व्यक्तीला हे विडंबन असल्याने यातूनआपल्या देवतेचा अपमान होतो, याविषयी सांगायला हवे. योग्य रांगोळ्या काढण्यासाठी सनातनचा‘रांगोळी’ हा लघुग्रंथ त्यांना द्यावा.
१ उ. वहीवर गणपतीचा स्टीकर असणे आणि वही कोठेही ठेवली जाणे : मित्रांनो, बर्याच जणांच्या वहीवर कार्टूनस्वरूपात असलेल्या गणपतीचा स्टीकर असतो. कार्टून स्वरूपातील गणपति असणे,ही एक विटंबना आणि असे चित्र असलेली वही कुठेही, कशीही ठेवून त्याची आणखी विटंबना केलीजाते. मित्रांनो, आपण सर्वांचे प्रबोधन करून हा गणपतीचा होणारा अपमान थांबवायलाच हवा.
१ ऊ. उदबत्त्यांच्या वेष्टनांवर गणपतीचे चित्र असणे : मित्रांनो, उदबत्त्या संपल्यावर तिची वेष्टने कचर्यात फेकून दिली जातात. ज्या देवतेला आपण आराध्य दैवत म्हणून पूजतो, तिची ही घोर विटंबनाचआहे. अशी विटंबना करण्यापेक्षा आपण देवतांची चित्रे वेष्टनावर असलेली उदबत्ती घ्यायचीच नाही. जेदुकानदार अशा उदबत्त्यांची विक्री करतात, त्यांना सांगायचे की, अशा उदबत्त्या तुमच्या दुकानात ठेवूनका.
१ ए. विसर्जनाच्या मिरवणुकीत गणपतीचा मुखवटा घालून हिडीस अंगविक्षेप करत नाच करणे: काही जण विसर्जनाच्या मिरवणुकीत गणपतीचा मुखवटा घालतात आणि ‘रीमिक्स’ गाण्यांवर हिडीसअंगविक्षेप करत नाचतात. हीसुद्धा आपल्या गणपतीची होणारी घोर विटंबनाच आहे. मित्रांनो, अशीविटंबना होत असलेली आढळल्यास आपण ती लगेचच थांबवायला हवी, तरच गणेशाची कृपा होईल.तसेच गणपतीसमोर अशा प्रकारे नाचून त्याला निरोप देण्याने मुलांच्या मनातील गणपतीविषयी भक्तीभाववाढेल का ? यासाठी हा हिडीस प्रकार बंद करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत.
१ ऐ. गणपतीचे चित्र असलेले दप्तर वापरणे : दप्तर ही देवतांची चित्रे लावण्याची जागा आहे का ?ज्या दप्तरांवर गणपतीचे किंवा अन्य देवतांचे चित्र आहे, अशा दप्तरांची खरेदीच करू नका. आपण दप्तर कसेही ठेवतो आणि अप्रत्यक्षरित्या देवतेचे विटंबनच करतो. आपण आपल्या मित्रांनाही सांगायला हवे की,अशा दप्तरांची खरेदीच करायची नाही.
मित्रांनो, या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण निश्चय करायचा आहे की, आमच्या बुद्धीदात्या गणपतीची विटंबना आम्ही कदापी सहन करणार नाही. त्याने दिलेल्या बुद्धीमुळेच आम्ही अभ्यास करतो.आपण गणपतीच्या चरणी क्षमा मागून प्रार्थना करूया, ‘हे गणराया, आजपर्यंत आमच्याकडून जर अज्ञानानेतुझे विडंबन आणि विटंबना झाली असेल, तर तू आम्हाला क्षमा कर. आम्ही अनंत अपराधी आहोत. हेगणराया, हे सर्व थांबवण्यासाठी तूच आमच्याकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करून घे’, हीच तुझ्या चरणीप्रार्थना !
– श्री. राजेंद्र पावसकर (गुरूजी), पनवेल.