१. स्वामी विवेकानंदांनी जीवनात ‘गुरुकृपायोग’ येण्यासाठी केलेले प्रयत्न
१ अ. वडील निवर्तल्यावर नरेंद्रच्या घरची श्रीमंती झपाट्याने खालावणे, वणवण फिरूनहीनोकरी न मिळणे, सद्गुरु श्रीरामकृष्णांना शरण गेल्यावर शाळेत अल्प वेतनाची नोकरी मिळणेआणि सद्गुरूंच्या गळ्याच्या कर्करोगाचे दुखणे बळावल्यामुळे नोकरी सोडून पूर्णवेळगुरूंसमवेत रहाणे :स्वामी विवेकानंदांचे पूर्वाश्रमीचे नाव ‘नरेंद्र’ असे होते. नरेंद्रला गुरुप्राप्तीची तीव्रतळमळ लागली. तेव्हा त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आयुष्याच्या ऐन उमेदीच्याकाळात त्याचे वडील निवर्तल्यामुळे त्याच्या एकट्यावर संपूर्ण कुटुंबाच्या भरणपोषणाचे दायित्व आले. वडील निवर्तल्यावर घरची श्रीमंती झपाट्याने खालावली. ती सुधारण्यासाठी नरेंद्रला नोकरी करण्याविनाकुठलाही पर्याय नव्हता. नरेंद्रला वणवण फिरूनही नोकरी मिळेना. घरी खाणारी ६ माणसे आणि घरामध्येअन्नाचा कणही नाही. पुढे उधार-उसनेही मिळणे कठीण झाल्यावर नरेंद्र सद्गुरु श्रीरामकृष्णांना शरणगेला. तेव्हा सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने त्याला शाळेत अल्प वेतनाची मुख्याध्यापकाची नोकरी मिळाली.नरेंद्र ती नोकरी जेमतेम ४ मासच करू शकला. नंतर सद्गुरूंच्या गळ्याच्या कर्करोगाचे दुखणेबळावल्यामुळे नरेंद्रला ‘घर-दार आणि कुटुंब’ हे सर्व वार्यावर सोडून सतत सद्गुरूंच्या सान्निध्यात रहावेलागले. या प्रसंगी नरेंद्रने मायेतील सर्व दोर छाटून टाकले आणि केवळ गुरूंची सेवा घडावी, यासाठी तोपूर्णवेळ सदासर्वकाळ त्यांच्यासमवेत राहू लागला.
१ आ. जिज्ञासू वृत्ती, शिकण्याची तळमळ, जिद्द, सेवाभाव आणि सद्गुरूंवरील दृढ निष्ठायांमुळे गुरुकृपा होऊन नरेंद्र प्रवेगे ‘सत्शिष्य’ या पदावर आरूढ होणे : या काळात सद्गुरूंनीत्याला ज्ञान-विज्ञानातील अनेक गूढ रहस्यांचा उलगडा करून दाखवतांना घरगुती उपमा-दृष्टांतांच्यामाध्यमातून मानवी कल्याणासाठी धर्मतत्त्वांचा उपयोग कसा करता येईल, हे सोप्या शब्दांतून शिकवले.नरेंद्रमधील जिज्ञासू वृत्ती, शिकण्याची तळमळ, जिद्द, समर्पितभावाने सेवा करण्याची वृत्ती आणिसद्गुरूंवरील ठाम निष्ठा या गुणांमुळे श्रीरामकृष्णांची त्याच्यावर कृपा झाली आणि नरेंद्र प्रवेगे ‘सत्शिष्य’या पदावर आरूढ झाला.
२. नरेंद्रची गुरुसेवा
२ अ. समर्पितभावाने सेवा करून गुरुसेवेचा आदर्श उभा करणे : नरेंद्रने ‘सत्शिष्य’ या नात्यानेसद्गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांची त्यांच्या शेवटच्या रुग्णस्थितीत अत्यंत समर्पितभावाने सेवा केली होती.हे करत असतांना त्याने आपल्या पंधरा गुरुबंधूंसमोर गुरुसेवेचा आदर्श उभा केला.
२ आ. सद्गुरूंच्या असाहाय्य अवस्थेत स्वतः काहीच करू शकत नसल्याची खंत वाटणे :श्रीरामकृष्ण परमहंस गळ्याच्या कर्करोगाने मरणासन्न अवस्थेत होते. त्या दयनीय अवस्थेमध्ये त्यांनानिवासासाठी कुठेही स्थान उपलब्ध होऊ शकले नाही. देहलीला संपवण्याच्या शेवटच्या काळात त्यांचामुक्काम काशीपूर उद्यानामध्ये उघड्यावरच होता. त्यांच्या घशाखाली अन्नाचा एक कणही उतरत नसे.त्यांचे शरीर अत्यंत कृश झाले होते. अशा स्थितीत श्रीरामकृष्ण परमहंस नरेंद्रला म्हणाले, ‘तू मलाखांद्यावरून तुझ्या इच्छेनुसार कुठेही घेऊन जा. ती कुडाची झोपडी असो किंवा झाडाखालची मोकळी जागाअसो, तेथे मी राहीन.’ सद्गुरूंच्या या अवस्थेकडे बघून नरेंद्रला असह्य वेदना होत असत. त्याच्याडोळ्यांमधून घळाघळा अश्रू वहायचे. ‘आपण सद्गुरूंसाठी काहीच करू शकत नाही’, याची खंत नेहमीत्याला वाटायची.
२ इ. असे झाले सद्गुरु श्रीरामकृष्णांचे महानिर्वाण : सद्गुरु श्रीरामकृष्णांचा महानिर्वाणाचा दिवसआला. १५ ऑगस्ट १८८६ या उत्तररात्री पहाटे १.०२ मिनिटांनी सद्गुरूंनी देहत्याग केला. त्यांची दृष्टीनासिकाग्राकडे होती आणि मुखावर शिशुवत स्मित होते. १६ ऑगस्ट १८८६ या दिवशी संध्याकाळी ६वाजता श्रीरामकृष्णांच्या पार्थिव देहाला अग्नी दिला. या वेळी शिष्यगणांनी कुठल्याही प्रकारे दुःख व्यक्तकेले नाही. ते भजन म्हणत होते. ‘जय श्रीरामकृष्ण की जय’ असा गजर करत गंगाकिनारी वराहनगरघाटावर श्रीरामकृष्णांचे अंतिम संस्कार करण्यात आले.
३. ‘गुरूंसाठी मठ बांधणे’ह्याव्यक्तिगतध्येयाकडे वाटचाल
३ अ. सद्गुरूंनी दिलेला ‘गुरु-शिष्य’ परंपरेचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांनीदिलेल्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी, मठाची स्थापना करण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोकळ्यापटांगणाकडे पहात रहाणे : नरेंद्र विचारमग्न अवस्थेमध्ये नदीपलीकडील विस्तीर्ण मोकळ्यापटांगणाकडे पहात उभा होता. ‘सद्गुरूंच्या अंतःकाळी त्यांना निवारा उपलब्ध करून देऊ शकलो नाही’,याचे शल्य त्याला सतत बोचत होते. ‘सद्गुरूंनी दिलेला ‘गुरु-शिष्य’ परंपरेचा वारसा टिकवूनठेवण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी, तसेच सद्गुरूंसाठी कायमस्वरूपी निवाराअसावा’, या उद्देशाने त्याला मठाची स्थापना करायची होती. यासाठी तो त्या मोकळ्या पटांगणाकडेएकटक पहात उभा होता.
३ आ. सद्गुरूंसाठी मठ बांधून होईपर्यंत त्यांचे अस्थीविसर्जन न करण्याची प्रतिज्ञा करूनगुरूंच्या अस्थी एका भक्ताच्या पडक्या घरात सांभाळून ठेवणे : मठाची स्थापना करण्याचा उद्देशयशस्वी व्हावा, यासाठी त्याने मनातल्या मनात प्रतिज्ञा केली, ‘जोपर्यंत मी माझ्या सद्गुरूंच्या निवार्यासाठीमठ बांधत नाही, तोपर्यंत मी त्यांचे अस्थीविसर्जन करणार नाही. त्याप्रमाणे त्याने सद्गुरूंचा दहनविधीआटोपल्यावर त्यांच्या अस्थी वराहनगरमधील श्रीरामकृष्णांच्या एका भक्ताच्या पडक्या घरात(सांप्रतकाळच्या वराहनगरमठात) ताम्रकलशामध्ये सांभाळून ठेवल्या होत्या. नरेंद्रने त्याच्या जीवनातीलव्यक्तिगतध्येयामध्ये ठरवलेल्या अनेक टप्प्यांपैकी हा प्रथम आणि प्रमुख टप्पा होता.
३ इ. सर्वसंगपरित्याग करण्यास उत्सुक असलेले अनेक पाश्चात्त्य अनुयायी लाभल्याने स्वामीविवेकानंद या रूपाने ‘गुरूंसाठी मठ बांधणे’ याव्यक्तिगतध्येयाकडे वाटचाल होणे : नरेंद्रने‘सत्शिष्य’ या नात्याने आणि ‘स्वामी विवेकानंद’ या रूपाने जेव्हा सद्गुरूंकडून प्राप्त झालेल्या ज्ञानरूपीवारसाने ‘सनातन हिंदु धर्मा’चे तेज संपूर्ण विश्वभरात प्रस्थापित केले, तेव्हा साहजिकच त्याला अनेकपाश्चात्त्य अनुयायी सर्वसंगपरित्याग करून गुरुकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी शिष्यरूपाने लाभले. यातूनस्वामींच्या मनात घोळत असलेले ‘गुरूंसाठी मठ बांधणे’ याव्यक्तिगतध्येयातील ‘एक महत्त्वपूर्ण टप्पापूर्णत्वाला जाणार’, असे त्यांच्या दृष्टीपथास आले.
३ ई. बेलूर गावी गंगाकिनारी अतिशय रम्य ठिकाणी मठ बांधण्याचे निश्चित होणे : गंगाकिनारीबेलूर गावी ७ एकर मोकळी भूमी स्वामींच्या मनात पूर्वीपासूनच भरलेली होती. ती भूमी सखल नव्हती;परंतु नदीकिनारी असल्याने आणि वृक्ष-वनस्पतींमुळे नटल्याने ते स्थान अतिशय रम्य होते. त्यामध्ये एकाकोपर्यात एक जुनी इमारतही होती. ती तात्पुरती रहाण्यायोग्य करून स्वामींनी विस्तीर्ण भूमीवर मठबांधायचे निश्चित केले.
३ उ. स्वामींच्या विदेशी अनुयायांनी मठासाठी लागणारा व्यय अर्पण करणे आणि हरिप्रसन्न याअभियंत्याने मठाची वास्तू उभारण्याचे दायित्व घेणे : स्वामींच्या विदेशी शिष्या कु. हेन्रिएटा मूलरयांनी मठासाठी लागणार्या भूमीची किंमत ३९ सहस्र रुपये स्वामींच्या चरणी अर्पण केले आणि त्यासमवेतदुसर्या विदेशी शिष्या श्रीमती ओलि बुल यांनी बांधकामासाठी ६० सहस्र रुपये व्यय करण्याची सिद्धतादर्शवली. साधारण १ लक्ष रुपयांची सोय गुरुकृपेमुळे झाली होती. त्याच कालावधीत सद्गुरुश्रीरामकृष्णांचे अभियांत्रिक झालेले शिष्य हरिप्रसन्न आपल्या पदाचा राजीनामा देऊन ‘श्रीरामकृष्णमिशन’मध्ये भरती झाले होते. त्यांना स्वामींनी ब्रह्मचारी पदाची दीक्षा देऊन त्यांचे नामकरण ‘स्वामीविरजानंद’ असे केले आणि त्यांच्याकडे मठाची वास्तू उभारण्याचे दायित्व सोपवले.
४. समाजासाठीचे कार्य
४ अ. मठाच्या बांधकामास आरंभ करतांना कलकत्त्याला ‘प्लेग’च्या साथीने माणसे मृत्यूमुखीपडल्यानेव्यक्तिगत आणि सामाजिकध्येयाच्या संदर्भात प्रश्न पडणे, स्वामी विवेकानंदांनी गुरूंचीशिकवण आठवून आपत् प्रसंगात व्यक्तिगत ध्येयापेक्षा सामाजिक ध्येयाला अधिक महत्त्व देणे : स्वामीविवेकानंदांनी बेलूर मठाच्या बांधकामासाठी लागणारी पूर्वसिद्धता पूर्ण केली. बांधकामाला आरंभ कधीकरायचा, याचा ते विचार करत होते. त्या वेळी स्वामींपुढे धर्मसंकट उभे राहिले. हे संकट म्हणजे त्यांचीसत्त्वपरीक्षाच होती. या वेळी कलकत्त्याला ‘प्लेग’च्या साथीने थैमान घातले होते. या संसर्गजन्य रोगामुळेसभोवतालची माणसे पटापट मृत्यूमुखी पडत होती. त्यामुळे स्वामींसमोर ‘प्राप्त परिस्थितीत ‘मी गुरूंसाठीमठ बांधण्याच्या व्यक्तिगत ध्येयाकडे लक्ष द्यावे कि गुरूंनी शिकवल्यानुसार ‘शिवभावे जीवसेवा!’ या न्यायानेसामाजिक स्तरावरील कार्याला वाहून घ्यावे ?’, असा प्रश्न पडला. स्वामी विवेकानंदांनी आपत् प्रसंगउद्भवल्यावर स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून विचार केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, ‘गुरूंपेक्षागुरूंचे कार्य करणे केव्हाही सर्वश्रेष्ठच आहे.’ त्यामुळे त्यांनी ‘गुरूंसाठी मठ बांधणे’, याव्यक्तिगतध्येयालातिलांजली देण्याचा निर्णय घेतला.
४ आ. स्वामी विवेकानंदांनी गुरुबंधूंना समवेत घेऊन ‘प्लेग’सारख्या संसर्गजन्य रोगाने पिडीतलोकांची सेवा करण्यास आरंभ करणे : स्वामी विवेकानंदांनी आपत् प्रसंगात गुरूंच्या कार्यालाम्हणजेच ‘शिवभावे जिवसेवा!’ या सामाजिक ध्येयाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आणि तडकपणेगुरुबंधूंना समवेत घेऊन या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. यामध्ये रुग्णांची शुश्रूषा कशी करायची,गावाबाहेर छावण्या कशा उभ्या करायच्या, औषधे, वस्त्रे इत्यादींचा पुरवठा कसा करायचा, अशासमस्यांमध्ये स्वामींनी जातीने लक्ष घातले आणि गुरुबंधूंना समवेत घेऊन ‘प्लेग’सारख्या संसर्गजन्य रोगानेपिडीत लोकांची सेवा केली.
४ इ. सामाजिक कार्यासाठी लागणारा वाढीव निधी उभा करण्याविषयी प्रश्न गुरुबंधूंनी विचारताचमठासाठी मिळालेली भूमी विकून पैसा उभा करण्यास सांगणे, तसेच ‘संन्याशांचे जेवण भिक्षामागून आणि विश्राम झाडाखालीच असायला हवा’, याची जाणीव करून देणे : स्वामींनीअकस्मात चालू केलेल्या या सामाजिक कार्याचा आवाका फारच मोठा होता. केवळ एवढेच नव्हे, तरदिवसेंदिवस त्याची व्याप्तीसुद्धा वाढत गेली. तेव्हा ‘भावी योजना आखतांना आणि त्या प्रत्यक्षात आणतांनाआवाक्याबाहेर व्यय येईल’, असे सर्वांच्या लक्षात आले. त्याप्रसंगी स्वामींना गुरुबंधूंनी ‘या कार्यासाठीलागणारा वाढीव निधी कुठून आणणार ?’ असा प्रश्न केला. यावर स्वामी ताडकन् उत्तरले, ‘का ?मठासाठी नुकतीच विकत घेतलेली भूमी आपल्याकडे आहे ना ? ती विकून आपल्याला आवश्यक असानिधी उभा करता येईल !’ शेवटी लौकिक दृष्टीने आपण कितीही मोठे दिसत असलो, तरी आपणसंन्यासीच आहोत ना ? तेव्हा आपले जेवण भिक्षा मागून आणि विश्राम झाडाखालीच असायला हवा !’
४ ई. सद्गुरु श्रीरामकृष्णांनी स्वामींना अंतःप्रेरणा देऊन समाजासमोर साहाय्यासाठी आवाहनकरण्यास सांगणे आणि स्वामींनी त्यानुसार जनसमुदायासमोर भाषण देऊन साहाय्यासाठीआवाहन केल्यावर उदंड प्रतिसाद मिळणे : स्वामींनी ‘वेळप्रसंगी गुरूंच्या मठाची जागा आवश्यकतापडल्यास विकूया’, असा धाडसी निर्णय घेतल्यामुळे गुरुकृपेचा ओघ त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात आकृष्ट झाला; पण स्वामींवर मठाची भूमी विकण्याचीr वेळ आलीच नाही. या वेळी सद्गुरु श्रीरामकृष्णांनीस्वामींना अंतःप्रेरणा देऊन समाजासमोर साहाय्यासाठी आवाहन करण्यास सुचवले. स्वामींनी त्यानुसारतडकपणे एक प्रकट भाषण देऊन उपस्थित जनसमुदायाकडे साहाय्यासाठी आवाहन केले. विशेष म्हणजेजनसामान्यांनीसुद्धा त्याला उत्कट प्रतिसाद दिला आणि स्वतःचा खारीचा वाटा उचलून आवश्यक तेसाहाय्य तत्परतेने उपलब्ध करून दिले.
५. गुरुकृपेमुळेव्यक्तिगतध्येयपूर्ती होणे
५ अ. स्वामी विवेकानंदांनी काळानुरूप घेतलेल्या अचूक निर्णयामुळे ‘समाजासाठीचे कार्य’ साध्यकरतांना गुरुकृपेमुळे ‘व्यक्तिगतध्येयपूर्ती’ ही साध्य करता येणे : स्वामी विवेकानंदांनी काळानुरूप घेतलेल्याअचूक निर्णयामुळे ‘सामाजिक ध्येय’ साध्य करत असतांना कार्यासाठी लागणार्या आवश्यक धनाची चिंतामिटली. तसेच व्यक्तिगतध्येयामध्ये आलेली अडचण म्हणजे बेलूर मठाचे बांधकाम रहित करावे लागणारहोते, तेसुद्धा अल्पकाळात पूर्णत्वाला गेले. अशा प्रकारे स्वामींना त्यांचीव्यक्तिगत आणि सामाजिकदोन्ही नियत ध्येये गुरुकृपेमुळेएकाच वेळी साध्य करता आली.
५ आ. स्वामी विवेकानंदांनीव्यक्तिगतध्येयपूर्तीच्या प्रसंगी गुरुऋणातून अंशतः मुक्त झाल्याचाआनंद उपभोगणे : शेवटी स्वामींच्या जीवनातीलव्यक्तिगतध्येय साध्य होण्याचा मंगल दिवस उजाडला. तोदिवस म्हणजे ९ डिसेंबर १८९८ हा होय. या दिवशी स्वामींनी प्रातःकाळी गंगास्नान आटोपून रहात्याठिकाणी देवघरात प्रवेश केला. पूजकाच्या आसनावर बसून फुलाच्या परडीतील फुले आणि बेलपत्रे एकाओंजळीत घेऊन सद्गुरु श्रीरामकृष्णांच्या पादपद्मीअर्घ्यप्रदान केले आणि थोडा वेळ ते गंभीर ध्यानमग्नअवस्थेत बसून राहिले.
५ इ. स्वामींनी ताम्रकलशामध्ये जपून ठेवलेल्या सद्गुरूंच्या अस्थी उजव्या खांद्यावर घेऊनसंन्यासी आणि शिष्यगणांसमवेत नूतन मठाच्या वास्तूकडे जाणे अन् वाजत-गाजत जातांनागंगातटभूमीही त्या तालावर नृत्य करत असल्याचे जाणवणे : काय अपूर्व दृष्य होते ते ! त्या वेळी त्यांच्या आत्मप्रभामंडित स्निग्धोज्ज्वल कांतीने सारे मंदिर एका अलौकिक तेजाने भरून गेले होते. पूजनआणि ध्यान आटोपल्यावर स्वामींनी इतर संन्यासी अन् शिष्यगण यांच्यासमवेत नूतन मठाच्या वास्तूच्याठिकाणी जाण्याची सिद्धता चालू केली. स्वामीजी ताम्रकलशामध्ये जपून ठेवलेल्या सद्गुरूंच्या अस्थीउजव्या खांद्यावर घेऊन पुढे निघाले, तेव्हा इतर संन्यासी आणि भक्तमंडळी शंख, घंटा, टाळ, मृदुंग घेऊनवाजत-गाजत त्यांच्यासमवेत नूतन मठाच्या वास्तूकडे निघाले. ‘या ध्वनीने सारी गंगातटभूमी निनादलीआणि जणू ती त्या तालावर नृत्य करू लागली आहे’, असे सर्वांना जाणवू लागले.
५ ई. सद्गुरूंना अस्थीकलश स्वरूपात स्वतःच्या खांद्यावर घेऊन नूतन मठामध्ये जाणे आणिपूर्वीसदगुरुनी‘तुझ्या इच्छेनुसार खांद्यावरून कुठेही घेऊन जा’, असे सांगितल्याची आठवणहोणे : या आनंदमय आणि मंगलमय प्रसंगी स्वामींनी त्यांच्यासमवेत असलेल्या एका शिष्याला त्यांचासद्गुरूंशी झालेला संवाद सांगितला. ते म्हणाले, ‘सद्गुरूंनी सांगितले होते, ‘‘तू मला खांद्यावर घेऊन तुझ्याइच्छेनुसार नेऊन बसवशील, तेथे मी बसेन, मग ती कुडाची झोपडी असो किंवा झाडाखालची मोकळीजागा असो.’’ त्यांच्या कृपाशीर्वादाने आज मी त्यांना अस्थीकलश स्वरूपात स्वतःच्या खांद्यावर घेऊन नूतनमठामध्ये जात आहे.’
५ उ. श्रीरामकृष्णांच्या अस्थीकलशाचे नूतन मठाच्या वास्तूमध्ये पूजन होणे : नूतन बेलूर मठाच्यावास्तूमध्ये पोहोचल्यावर स्वामींनी श्रीरामकृष्णांचा अस्थीकलश सुयोग्य जागी ठेवला. तेथे स्वतःच्याहातांनी त्यांनी अस्थीकलशाचे पूजन केले. नंतर स्वतःच्या हातांनी पायस (खीर) बनवून श्रीरामकृष्णांनानेवैद्य दाखवला. शेवटी साष्टांग प्रणिपात करून त्यांनी श्रीरामकृष्णांच्या चरणी मनोमन कृतज्ञता व्यक्तकरून या मंगलमय प्रसंगी तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना उद्देशून पुढील स्वरूपाचे मनोगत व्यक्त केले.
६. स्वामी विवेकानंदांनीव्यक्तिगतध्येयपूर्तीच्या
आनंद सोहळ्याच्या प्रसंगी व्यक्त केलेले मनोगत !
स्वामी विवेकानंदानी व्यक्तिगत ध्येयपूर्तीच्या आनंद सोहळ्याच्या प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना पुढीलस्वरूपाचे उद्गार काढले. ‘जोपर्यंत श्रीरामकृष्णांच्या नावावर त्यांचे अनुयायी पवित्रता, आध्यात्मिकताआणि मानवमात्रांवरील समान प्रीतीचे आदर्श यांचे रक्षण करू शकतील, तोपर्यंत श्रीरामकृष्ण या मठालाआपल्या निवासाने धन्य करतील !’