छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक अद्भुत प्रसंग !

        ‘समर्थ रामदास स्वामींचे शिष्य छत्रपती शिवाजी महाराज मोगलांशी लढत होते. शूरवीर महाराजांशी उघडपणे युद्ध करण्यास असमर्थ असणार्‍या मोगलांनी अघोरी विद्येचा उपयोग करून महाराजांची एकांतात हत्या करण्याचा कट रचला. एक मोगल कोणत्यातरी तंत्र-मंत्राच्या बळावर पहारा देणार्‍या सैनिकांची दृष्टी चुकवून विघ्न-बाधा पार करून शिवाजी महाराज जेथे आराम करत होते, त्या दालनात पोहोचला. म्यानातून तलवार काढून तो महाराजांवर वार करणार, तोच एका अदृश्य शक्तीने त्याचा हात धरला. मोगलाला वाटले, ‘मी सर्वांची दृष्टी चुकवून जादू-टोण्याच्या विद्येच्या बळावर येथपर्यंत पोहोचण्यात तर सफल झालो; पण आता ऐन वेळी मला कोण अडवत आहे ?’ त्याला लगेच उत्तर मिळाले, ‘रक्षकांपासून वाचवून तुझा इष्ट तुला येथपर्यंत घेऊन आला, तर महाराजांचा इष्टही महाराजांना वाचवण्यास उपस्थित (हजर) आहे.’

         महाराजांचा इष्टदेव त्या मोगलाच्या इष्टपेक्षा सात्त्विक होता; म्हणून शत्रूचे दुष्ट संकल्प निष्फळ ठरले. शिवाजी महाराजांचे रक्षण झाले.’

संदर्भ : मासिक ‘ऋषीप्रसाद’, जुलै २००२