शून्याची निर्मिती

शून्याची निर्मिती ही भारतियांनी जगाला दिलेली देणगी असणे आणि ऋषींनी गणितावर ग्रंथ लिहिलेले असणे !

भारतीय ऋषींनी अंकशास्त्रावर सखोल अभ्यास करून त्याचा उपयोग अंकगणित, बीजगणित, भूमिती आणि ज्योतिषशास्त्र यांत केलेला आढळतो. शून्याची निर्मिती ही भारतियांनी जगाला दिलेली देणगी आहे. आर्यभट्ट हे प्राचीन गणिती आणि ज्योतिर्विद होते. त्यानंतर भास्कराचार्यांनी सिद्धान्त शिरोमणी या ग्रंथाचे ४ विभाग केले –

१. लीलावती
२. बीजगणित
३. गणिताध्याय
४. गोलाध्याय

यांपैकी लीलावती हा गणितावरील ग्रंथ अधिक लोकप्रिय आहे. पाचव्या-सहाव्या शतकातील प्रसिद्ध ज्योतिषी आणि गणितज्ञ वराहमिहिर यांच्या पंच सिद्धांतिका या ग्रंथात शून्याचे उल्लेख वारंवार येतात. अंकाची सुरुवातही ० ते ९ आहे. बाकी अंक यांचाच विस्तार आहे. – प.पू. परशराम माधव पांडे (श्री गणेश-अध्यात्म दर्शन, पृष्ठ ४५)

आतापर्यंत आपल्याला एवढेच माहीत असेल की, शून्य ही भारतियांची जगाला देणगी आहे, पायथागोरसचे सूत्र बोधायनांनी सांगितले होते वगैरे. हे तर हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. गणितामध्ये भारतियांनी प्रचंड प्रगती केली होती आणि त्यांचे ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. यातील वटेश्‍वर सिद्धांत (ख्रिस्ताब्द ९०४) सारखे ग्रंथ तर मोठमोठे गणितज्ञसुद्धा समजू शकत नाहीत.

पायथागोरस सूत्राचे मूळ असलेले बोधायनांचे सूत्र

दीर्घचतुरस-अक्ष्णया रज्जुः पार्श्‍वमानी तिर्यङ्मानी च
यत्पृथग्भूते कुरुतः तदुभयं करोति ।
– बोधायन शुल्बसूत्र, १.४८

अर्थ :काटकोन त्रिकोणाच्या कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ त्याच त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंवरील चौरसाच्या क्षेत्रफळांच्या बेरजेएवढे आहे.

गणित, बीजगणित, द्विघाती समीकरण आदींचे मूळ भारतातच !

पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास ३६५.२५८१ दिवस लागतात, हे गणित भास्कराचार्यांनी कित्येक शतके आधीच करून दाखवले होते. पायचे मूल्य सर्वप्रथम बुधायन यांनी दाखवून दिले. आधुनिक पायथागोरस प्रमेयाची उकल त्यांनी फार आधी म्हणजे सहाव्या शतकात युरोपियन गणिततज्ञांपूर्वीच केली होती. बीजगणित, कलनशास्त्र, त्रिकोणमितीचा उगम भारतातलाच. ११ व्या शतकात श्रीधराचार्यांनी द्विघाती समीकरण समजावून सांगितले. ग्रीक आणि रोमन अधिकाधिक १० चा ६ वा घात येथपर्यंतच्या संख्येचा वापर करत होते. तेव्हा भारतात ख्रिस्तपूर्व ५००० मध्ये १० च्या ५३ व्या घातपर्यंतच्या संख्येचा वापर होता आणि त्याला विशिष्ट संज्ञा दिलेल्या होत्या. आजदेखील फक्त १० चा १२ वा घात इथपर्यंतचीच नावे वापरली जातात.

Leave a Comment