सूर्याच्या पृष्ठभागावर ज्वालामुखी असणे
महाभारत युद्ध चालू असतांना सूर्यग्रहण होते. त्याचे वर्णन व्यासांनी अशा शब्दांत केले आहे, ‘द्विधाभूत इवआदित्यः ।’ याचा अर्थ सूर्य उगवताच दोन भागांचा झाला. पुढे व्यास म्हणतात, सूर्य नेहमीप्रमाणे किरण फेकण्याऐवजी प्रदीप्त ज्वाला बाहेर ओकू लागला. आता आधुनिक विज्ञानाने सूर्याच्या पृष्ठभागावर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याचे मागे दूरचित्रवाणीवर दाखवले होते. त्यामुळे व्यासांनी सत्य सांगितले होते, हेच खरे !
१. गॅलिलिओच्या सहस्रो वर्षे आधी लिहिलेल्या ऋग्वेदात सूर्यावरच्या डागाचे वर्णन आहे.
२. आकाशगंगा गोल आहे, हे विज्ञानाला आता कळलेले ज्ञान वेदकाळात हिंदूंना होते.आकाशगंगा मूलभूत असून त्यातून हे जग बनले आहे आणि आपले जग तिच्यावरच आधारलेले आहे, हे ज्ञान वेदकाळी होते.
संदर्भ :वैदिक विज्ञान व वेदकालनिर्णय, पृ. २५.डॉ. पद्माकर विष्णु वर्तक
ग्रह
सर्व ग्रह प्राथमिक अवस्थेत तप्त स्वरूपात असून कालांतराने थंड झाले, याचा उल्लेख ऋग्वेदात आहे. त्याचा आधुनिक विज्ञानाने आता शोध लावला.
नक्षत्र
अगणित तारकांपैकी केवळ अभिजित नक्षत्र तेवढेच इ.स. पूर्व १२ सहस्र वर्षे या काळी ढळले, हे आजच्या विज्ञानाला कळलेले ज्ञान सहस्रो वर्षांपूर्वी व्यासांनी महाभारतात सांगितलेले होते.आधुनिक शास्त्रज्ञांनी आता मान्य केले की, त्या वेळी वेगा (म्हणजे अभिजित नक्षत्र) खरोखरीच ढळले होते आणि हा तारा उत्तर ध्रुव बनला होता.