१. युरोपीय आणि अरबी यांचे संस्कृत भाषेशी साम्य आहे !
– विल्यम जोन्स, ‘वेल्श’ विद्वान
‘खिस्ताब्द १७८३ मध्ये विल्यम जोन्स नामक ‘वेल्श’ (वेल्श हा ‘ग्रेट ब्रिटन’मधील एक वंश आहे.)विद्वान कोलकात्यात न्यायाधीश म्हणून रुजू झाला. ग्रीक, लॅटीन, फ्रेंच, जर्मन, इटालियन, अरबी आणिफारसी या भाषा त्याला मुळात येत होत्या. भारतात येताच त्याने आणखी संस्कृत भाषा शिकण्यास प्रारंभकेला. संस्कृत शिकतांना त्याच्या लक्षात आले, ‘युरोपातील ग्रीक, लॅटीन भाषा, मध्य आशियातील अरबी,फारसी भाषा आणि भारतातील संस्कृत भाषा या एकमेकांपासून दूर असूनही त्यांच्यात साम्य आहे. याभाषा एकाच मूळ भाषेपासून उगम पावून इतिहासक्रमात हळूहळू पालटत गेलेल्या असून तिच्या सुधारितआवृत्त्या आहेत.’
२. ग्रीक, लॅटीन, फारसी इत्यादी भाषा ज्या मूळ भाषेवरून
उत्क्रांत झाल्या, ती मूळ भाषासंस्कृत आहे ! – जर्मन विद्वान प्रेडरिक श्वेगेल
जोन्सने कोलकात्यात स्थापन केलेल्या ‘एशियाटिक सोसायटी’चा सभासद अलेक्झांडर हॅमिल्टन हाही जोन्सप्रमाणेच संस्कृत भाषेचा प्रेमी होता. पॅरीसमध्ये युद्धकैदी म्हणून रहात असतांना तिथे त्याची प्रेडरिक श्वेगेल नामक जर्मन विद्वानाशी मैत्री झाली.
हॅमिल्टनकडून श्लेगेलने संस्कृतचे धडे घेतले. खिस्ताब्द १८०८ मध्ये श्लेगेलने भारतीय संस्कृती आणिसंस्कृत, ग्रीक, लॅटिन, फारसी आणि जर्मन या भाषांतील समान शब्द उदधृत करून असे म्हटले, ‘या सर्वभाषा ज्या मूळ भाषेवरून उत्क्रांत झाल्या, ती मूळ भाषा दुसरी-तिसरी कुठली नसून संस्कृतच आहे.’
३. आसामच्या राज्य संग्रहालयाचे मुख्य संचालक
डॉ. एस्. अहमद यांचे संस्कृतविषयी विचार !
आसामच्या राज्य संग्रहालयाचे मुख्य संचालक डॉ. एस्. अहमद हे संस्कृतप्रेमींपैकी एक होते. गौहत्तीविद्यापिठातून अहमद यांनी संस्कृतमध्ये पी.एच्.डी. संपादित केली आहे. उर्दू आणि संस्कृत या भाषांसहआणखी काही भाषांचा अहमद यांचा दांडगा अभ्यास आहे. संस्कृतच्या प्रचार-प्रसारासाठी देण्यात येणारापं. माखन प्रसाद दुआरा पुरस्कार वर्ष २००७ मध्ये अहमद यांना देण्यात आला. त्यांचे संस्कृतविषयीचे विचार पुढे दिले आहेत.
अ. ‘संस्कृती, तत्त्वज्ञान, गणित, वैद्यकीय किंवा अगदी युद्धशास्त्र यांसारख्या विषयांचेही जेवढेअभ्यास योग्य साहित्य संस्कृतमध्ये उपलब्ध आहे, तेवढे अन्य कोणत्याही भाषेत नाही.
आ. संस्कृतच्या अध्ययनाने मुलांना नैतिक आणि आध्यात्मिक बळ प्राप्त होऊ शकते. आजच्या तरुणपिढीला त्या शक्तीची नितांत आवश्यकता आहे. म्हणून शालेय स्तरापासूनच संस्कृतचे अध्ययन सक्तीचेकेले पाहिजे.
इ. भारतातले सारे प्राचीन साहित्य, शिलालेख संस्कृतमधून लिहिलेले असल्याने भारतीय इतिहास समजून घेण्यासाठीही संस्कृतचे अध्ययन महत्त्वाचे आहे.
ई. संस्कृत ही केवळ भारतियांची, केवळ हिंदु संस्कृतीवाल्यांची भाषा नव्हे. संस्कृत ही इंडोनेशियात लोकप्रिय आहे. जपानमध्ये तिच्याविषयीचे आकर्षण आहे आणि जर्मनी अन् अमेरिका येथेही तिच्याअभ्यासकांची संख्या वाढत आहे.
संदर्भ : दैनिक लोकसत्ता, (२८.१२.२००७)