१४ मे – इस्रायलचा स्वातंत्र्यदिन आहे. त्यानिमित्ताने…
इस्रायल म्हटले की, आपल्याला प्रथम आठवते, ती त्यांची ‘मोसाद’ नावाची जगप्रसिद्ध गुप्तहेरसंघटना ! त्यांची लष्करी सज्जता, प्रत्येक नागरिकाला असलेली लष्करी प्रशिक्षणाची सक्ती, दुसर्यामहायुद्धात ज्यूंचा छळ करणार्या जर्मनीतील लष्करी अधिकार्यांना युद्धानंतर जगभरातून शोधून काढूनआंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर आणण्याची इस्रायलची विजिगीषु वृत्ती… बहुतेकांच्या सांगण्यात इस्रायलम्हणजे युद्ध किंवा त्यासंबंधीच्या विविध कथांशी जोडला गेलेला देश ! १४ मे या दिवशी इस्रायलचास्वातंत्र्यदिन आहे. त्यानिमित्ताने या देशाच्या प्रगतीचा आलेख प्रसिद्ध करत आहोत.
१. पाणी आणि अन्नधान्य यांच्या उत्पादनाचे दुर्भिक्ष्य असूनही ६० वर्षांत मोठी झेप घेणाराइस्रायल !
प्रत्येक इस्रायली नागरिकाने त्याचे वैयक्तिक आयुष्य आपल्या देशासह जोडले, हेचइस्रायलच्या प्रगतीचे रहस्य आहे. इस्रायलच्या लढ्याला दोन सहस्रांपेक्षा अधिक वर्षांचा इतिहास आहे.मात्र त्यांचे स्वातंत्र्य अवघे ६० ते ६२ वर्षांचे आहे. अचूक सांगायचे, तर १४.५.१९४८ या दिवशीइस्रायल नावाचा देश अस्तित्वात आला. या ६० वर्षांत इस्रायलने फार मोठी झेप घेतली. इस्रायल सततयुद्धाच्या छायेत होता. देशाचे अस्तित्वच नष्ट करण्यासाठी सभोवतालची सर्व राष्ट्रे टपलेली होती. पाणीआणि अन्नधान्य यांच्या उत्पादनाचे दुर्भिक्ष्य असतांना अशी प्रगती करणे, ही खरोखरीच कौतुकाची अन्भारतासह जगातील अन्य देशांनी अनुसरावी, अशीच गोष्ट आहे.
२. इस्रायलने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तांत्रिक प्रगतीच्या दिशेने घेतलेली गरुडझेप !
२ अ. पाणी
२ अ १. समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी सिद्ध करणे : समुद्राच्या मचूळ, खारट पाण्यापासूनथेट पिण्याचे पाणी निर्माण करणारे तंत्रज्ञान इस्रायलने प्रगत केले. ‘व्हाईट वॉटर’ नावाचा त्यांचा मोठाप्रकल्प पहाण्यासाठी आम्ही गेलो होतो. एखादे साखर उद्योगालय (कारखाना) असते, तसा हा प्रकल्पआहे. अवाढव्य यंत्रसामुग्री, रासायनिक मिश्रणाचे भले मोठे सिलेंडर, मोठमोठे ‘वॉटर बेड’ यासगळ्यांमधून पाण्याचा प्रवाह जात-येत असतो. नंतर त्यावर पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी योग्य असलेलीकाही द्रव्ये मिसळून पिण्याचे पाणी सिद्ध होते. प्रतिदिन या प्रकल्पामध्ये काही दशलक्ष लिटर पाणी सिद्धहोते.
२ अ २. पाण्याची प्रक्रिया करतांना विजेची निर्मितीही होत असल्यामुळे विजेसाठी वेगळा व्ययकरण्याची आवश्यकता नसणे : ‘इतक्या सगळ्या प्रक्रियेतून सिद्ध झालेले पाणी फार महाग असल्यानेते सर्वसामान्यांना कसे परवडणार’, असे त्यांना विचारले. त्या वेळी त्यांनी पाण्यावरची प्रक्रिया चालूअसतांना तेच पाणी वापरून विजेची निर्मितीही होत असल्याची माहिती दिली. त्या विजेवरच तो सगळाप्रकल्प चालत होता. त्यासाठी त्यांना वेगळा व्यय करण्याची आवश्यकता नव्हती. कच्ची सामुग्री म्हणजेसमुद्राचे पाणी विनामुल्य उपलब्ध होत होते. या व्यतिरिक्त ही प्रक्रिया चालू असतांना जे पाणी पिण्यायोग्यरहात नाही, ते पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाते. त्याचे वेगळे उत्पन्न या आस्थापनाला मिळते.
२ अ ३. सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी शेतीसाठी उपयोगात आणणे : सांडपाणी प्रक्रियाउद्योगातही त्यांनी अशीच प्रगती केली. काळेशार, घाणेरडा वास असणार्या पाण्यातील सर्व अनावश्यकभाग (तेल, ग्रीस, कचरा इत्यादींनी युक्त असे पाणी) यांत्रिक प्रक्रियेने काढण्यात येतो. नंतर काही अंशीशुद्ध झालेले पाणी भूमीत साठवले जाते. शेतीला पूरक असे खनिज त्यात मिसळले जाते आणि ते पाणीशेतीसाठी विकले जाते. या सर्व गोष्टी यंत्राद्वारे होतात. त्यासाठीचे वीजपंप भूमीखाली असतात. त्यावरयंत्राद्वारेच देखरेखही ठेवली जाते. वापरलेल्या एकूण पाण्यापैकी ७५ टक्के पाण्याचा ते पुनर्वापर करतात.येत्या काही वर्षांमध्ये हे प्रमाण ९५ टक्के करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठीचे संशोधन त्यांच्याप्रयोगशाळांमध्ये चालू असते.
२ आ. कचरा
२ आ १. कचर्याच्या कच्च्या सामुग्रीवर वार्याची प्रक्रिया करणे : कचर्याच्या व्यवस्थापनातइस्रायलने मोठी क्रांती केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या वैयक्तिक आस्थापनांची मोठमोठी उद्योगालये(कारखाने) आहेत. सर्व कचरा तेथे एकत्र होतो. कचरा टाकून सिद्ध झालेले मोठे डोंगरच याआस्थापनांच्या सभोवती आहेत. त्यानंतर कचर्याची कच्ची सामुग्री आली की, प्रथम त्यावर वार्याचीप्रक्रिया केली जाते, म्हणजे एका मोठ्या फिरत्या ‘पॅनेल’वरून कचरा हवेच्या झोतासमोर जातो. त्यामध्येउडून जाण्यासारखे जे काही आहे (प्लास्टिक, कागद किंवा दोर्याचे तुकडे इत्यादी), ते सर्व उडून एकामोठ्या पिंपामध्ये पडते. उर्वरित कचर्यावर मग पाण्याची प्रक्रिया होते. त्यात कचर्यामधील जडवस्तूंवरची सगळी घाण निघून जाते. घाण निघून गेल्यावर तो कचरा टाकला जातो.
२ आ २. भूमीचा भराव करण्यासाठी या कचर्याचा वापर करणे : भूमीच्या भरावासाठी याकचर्याचा वापर करतात. आपल्याकडे भूमीचे सपाटीकरण करण्यासाठी एखाद्या ठिकाणची माती उकरूनतिथे खड्डा केला जातो. मग ती माती दुसर्या ठिकाणी आणून तिथे भराव टाकला जातो. इस्रायलमध्येत्यासाठी कचर्याचा वापर करतात. एकत्र झालेल्या एकूण कचर्यापैकी ७५ टक्के कचरा ‘लॅन्डफिल्ड’साठीउपलब्ध करून दिला जातो, म्हणजे त्याची विक्री होते. तो आस्थापनाच्या उत्पन्नाचा प्रमुख भाग असतो.कचरा वापरात येण्यापूर्वी त्याची कुजून जवळपास माती झालेली असते. त्यामुळे हा कचरा भूमीसाठीउपयुक्त ठरतो.
२ आ ३. कुजवलेल्या कचर्यावर प्रक्रिया करून शेतीसाठी खत बनवणे : कचरा व्यवस्थापनाचेआणखी एक नवे तंत्र म्हणजे ‘कंपोस्ट खत’ बनवले जाते. कुजवलेला कचरा मातीसदृश झाला की, त्यावरपुन्हा रासायनिक प्रक्रिया करून त्यात खत मिसळले जाते. नंतर ही माती शेतीसाठी खत म्हणून विकण्यातयेते. हा आस्थापनाच्या उत्पन्नाचा प्रमुख भाग आहे.
२ आ ४. उर्वरित कचर्याचा वापर म्हणजे टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे : उर्वरित कचरा म्हणजेप्लास्टिकच्या बाटल्या किंवा रिकाम्या बाटल्या यांपासून अनेक शोभेच्या वस्तू सिद्ध करण्यात येतात.कचर्याचा कोणताही भाग वाया जाऊ द्यायचा नाही, असा त्यांनी जणू चंगच बांधला आहे. आसंदीवरटाकण्यासाठीच्या फोमच्या गाद्याही कचर्यापासून सिद्ध केल्या आहेत. त्यावर प्रथमदर्शनी विश्वास बसतनाही; पण त्या वस्तू सिद्ध होतांना प्रत्यक्ष बघितले की, विश्वास ठेवावाच लागतो. हे उद्योगालयपहाण्यासाठी खुले ठेवले आहे. तेथे मुलांसाठी खेळणी आहेत, तीही अशीच टाकाऊ वस्तूंपासून सिद्धझालेली होती.
२ इ. शेती
२ इ १. ठिबक सिंचनाद्वारे शेती करणे : इस्रायलची शेती म्हणजे संशोधनाचा विषय आहे.आपल्याकडे शेतीला धो धो पाणी दिले जाते. अलीकडे विजेचे येणे-जाणे काही खरे नसते. त्यामुळेचकाहींनी पंपाचे बटण चालू ठेवून झोपण्याचा उपाय शोधला. वीज आली की, पंप चालू असल्यामुळे पाणीशेतातून अक्षरशः वाहून जाते. पाण्याचा असा अपव्यय आपल्याला परवडणारा नाही, हे लक्षात घेऊनइस्रायलने ‘ड्रीप इरिगेशन’ म्हणजे ‘ठिबक सिंचन’ शोधून काढले. आवश्यक तेवढेच पाणी वापरणे, हेत्याचे सूत्र आहे. पाणी जराही वाया जाऊ द्यायचे नाही, असे त्यांचे तंत्र आहे.
२ इ २. आवश्यकतेनुसार रोपांच्या मुळांना पाणी देणे : शेतभूमीत साधारण १ ते २ फुटांवर चरखोदलेले आहेत. त्यामधून पाणी वाहून नेणार्या नळ्या नेलेल्या आहेत. (त्या नळ्यांना ‘पाईप’ म्हणताचयेणार नाहीत, इतक्या त्या लहान आहेत.) या चरांच्या अगदी कडेला शेत किंवा रोपे असतात. रोप असेल,त्या ठिकाणी नळीला छिद्र असते. त्यातून पाणी येते आणि थेट मुळांनाच पोहोचते. त्या रोपाला आवश्यकअसेल, तितकेच पाणी दिले जात असल्यामुळे रोपाच्या भोवतालचा भाग पाण्याने भिजलेला रहातो. रोपांनापाणी देण्याच्या ठराविक वेळा आहेत.
२ इ ३. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वृद्धी करणे : सर्व प्रकारच्या शेतीला याच पद्धतीनेपाणी देण्यात येते. अनेकविध फळभाज्या, पालेभाज्या तसेच धान्य यांचेही उत्पादन घेतले जाते. शेतीतपेरणी, मशागत, लागवड यांमध्ये त्यांनी सतत संशोधन करून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले आणि त्याचावापर करून उत्पादन वाढवले. तेथील बहुतेक कामे यंत्राद्वारेच केली जातात. ‘पाणी प्रक्रिया उद्योगांना भेट’हे दौर्याचे मुख्य प्रयोजन असल्याने शेतीला भेट देण्याला विशेष वाव नव्हता.
२ ई. तांत्रिक प्रगती
२ ई १. अल्प लोकसंख्या असल्याची त्रुटी यंत्रांनी भरून काढणे : केवळ ७० लक्ष एवढीचइस्रायलची लोकसंख्या आहे. साहजिकच तेथे कामाच्या तुलनेत मनुष्यबळ अल्प आहे. मात्र ती त्रुटी त्यांनीयंत्रांनी भरून काढली आहे. एका जलशुद्धीकरण आस्थापनात चर्चा चालू असतांना सहज म्हणूनश्रमिकांच्या संख्येविषयी विचारल्यावर कळले की, एक मोठे उद्योगालय केवळ ५० जण चालवतात.रात्रीच्या वेळेस तर केवळ दोघेच जण आस्थापनाचे सर्व काम पहातात. ते केवळ पडद्यावर (स्क्रिन) बघतअसतात. त्यामुळे आस्थापनात जे काही चालू आहे, ते सर्व दिसते. काही अडचण आली, तरसंगणकाद्वारेच ती तातडीने सोडवली जाते. ५० श्रमिकांमध्येसुद्धा १० जणच केमिकल अभियंता होते,म्हणजे जलशुद्धीकरणासाठी लागणार्या रसायनांचे प्रमाण एकदा निश्चित केले की, त्यांचे काम संपले.त्यानंतर त्यांनी केवळ लक्ष ठेवायचे.
२ ई २. यंत्राद्वारे मार्गांची स्वच्छता करणे : इस्रायलमध्ये मार्गसुद्धा यंत्राद्वारेच झाडले जातात. पहाटेगाड्या येऊन ते काम करून जातात. त्या गाड्याही केवळ एकेक व्यक्तीच चालवत असते.
३. निष्कर्ष
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि त्यामध्ये सातत्याने संशोधन करणे, हा आधुनिकइस्रायलच्या प्रगतीचा पाया आहे.
– राजू इनामदार. (‘दैनिक लोकसत्ता’, २९.५.२०११)