१. स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांना गोवा विलीनीकरण चळवळीसाठी पुष्कळ पैसा व्यय करावा लागणे
`गोवा विलीनीकरणवादाच्या चळवळीसाठी महाराष्ट्राकडून पैसा आला, असा अपप्रचार काही जण करतात. प्रत्यक्षात महाराष्ट्रातून निधी आला नाही. बराच व्यय (खर्च) स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांना करावा लागला. महाराष्ट्रातून आलेली पथके, कार्यकर्ते यांचा आणि अन्य व्यय करणे भागच होते. त्या काळात अकारण कुणाला पैसे वाटण्याचा प्रश्नच नव्हता.
२. कर्जफेड करण्यासाठी पैसा नसल्यामुळे
‘आपला खनिज माल तुम्ही न्या’, असा पर्यायभाऊंनी संबंधितांना देणे
भाऊसाहेब बांदोडकर यांनी हा व्यय कुठून केला, असा प्रश्न या प्रतिनिधीनेकेला असता काकोडकर म्हणाल्या, ‘‘त्या वेळी भाऊंना (भाऊसाहेब बांदोडकर यांना) कर्ज घ्यावे लागलेहोते. विलीनीकरणाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात व्यय होत होता. एका उद्योजकाने त्यासंदर्भात जोर धरलाहोता. जनमत कौलाच्या चळवळीच्या वेळी सर्व बाजूंनी एवढा पैसा व्यय होत होता की, भाऊंनाआपल्याकडील बराच पैसा व्यय करावा लागला. नंतर कर्ज फेडण्यासाठीही हाती पैसा राहिला नाही. भाऊकधीच कुणाचे पैसे बुडवणारे नव्हते.’’ तेव्हा ‘त्यांनी कशा प्रकारे कर्जाची परतफेड केली असेल’, असाप्रश्न विचारला असता काकोडकर म्हणाल्या, ‘‘कर्जफेड करण्यासाठी पैसा नव्हता; पण पैसे तर परतकरायला हवे होते. अशा वेळी आपला खनिज माल तुम्ही न्या, असा पर्याय भाऊंनी संबंधितांना दिला.
आपल्याकडे परत करण्यासाठी पैसे नाहीत, असे भाऊंनी सांगितले. त्यानुसार ‘वेळगे’ येथील खनिज मालदेऊन कर्जाची फेड करण्यात आली.’’ काकोडकर म्हणाल्या, ‘‘जनमत कौलासाठी मतदान झाले, त्यादिवशीच भाऊ विश्रांती घेण्यासाठी महाबळेश्वरला निघून गेले होते.’’
३. जनमत कौलाचा निकाल कळल्यावर तात्पुरते वाईट वाटणे,
तेव्हा भाऊंना राजकारण नकोसे होणे; पण लोकांनी
‘आम्हाला भाऊ हवेच’,असा जोरदार आग्रह धरल्यावर त्यांनी विचार पालटणे
जनमत कौलाचा निकाल आम्हाला कळला, तेव्हा तात्पुरते वाईट वाटले. शेवटी लोकांना जसेहवे होते, तसे झाले, हे भाऊंनी मान्य केले. ‘आपल्याला आता काहीच नको. आपण आपल्या व्यवसायातच लक्ष घालतो’, अशी त्यांची भूमिका होती. त्यांनाच राजकारण नकोसे झाले होते; मात्र त्यावेळी दोनापावला आणि अन्य एका ठिकाणी लोकांच्या मोठ्या सभा झाल्या अन् ‘आम्हाला भाऊ हवेच’,असा जोरदार आग्रह लोकांनी धरला. ‘आम्हाला एकटे सोडू नका. आम्हाला तुमचे नेतृत्व हवे’, अशीमागणी लोकांनी केली आणि भाऊंनी विचार पालटला.’
– भाऊंच्या कन्या आणि माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर (दैनिक `लोकमत’, १६.१.२०११)