एक राजा आणि शेठजी यांची गाढ मैत्री होती. शेठजी चंदनाच्या लाकडांचा व्यापारी होता. ४-५ वर्षे त्याच्या लाकडाची विक्री झालीच नाही. त्याला असे वाटले की, हे लाकूड मूल्यवान आहे. हे लाकूड कोण विकत घेईल ? हे केवळ राजाच विकत घेऊ शकतो. शेठजीला असे वाटले की, राजा जर मेला, तर त्याला जाळण्याकरता चंदनाच्या लाकडांची आवश्यकता लागेल. त्यामुळे माझा व्यापार चांगला होईल.
इकडे राजाच्या मनात शेठजींच्या विषयी कुभाव उत्पन्न झाला की, हा शेठजी निपुत्रिक आहे. जर हा मेला, तर याचे धन राज्य भांडारात जमा होईल. दोघांच्याही मनात असे कुविचार येऊन गेले. जेव्हा ते भेटले, तेव्हा त्यांनी एकमेकांना आपापल्या मनातील विचार सांगितले.
राजाच्या मनात असे विचार यायचे कारण काय, तर शेठजींच्या मनात त्या राजाविषयी वाईट विचार आला; म्हणून राजाच्या मनात त्याची प्रतिक्रिया उमटली. राजाने शेठजींची कान उघडणी केली की, वाईट विचारांपेक्षा मनात चांगले विचार आणावे, उदा. राजाने आपल्या महालाचे दरवाजे चंदनाचे करावे आणि माझे सर्व चंदन विकले जावे.
– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)