१. गङ्गासदृशं तीर्थं न देवः केशवात् परः ।
ब्राह्मणेभ्यः परं नास्ति एवमाह पितामहः ।।
– महाभारत, पर्व ३, अध्याय ८३, श्लोक ९६
अर्थ : गंगेसारखे तीर्थ नाही, विष्णूसारखा देव नाही, ब्राह्मणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही,असे ब्रह्मदेवाने सांगितले.
२. आद्यशंकराचार्य यांनी गंगास्तोत्र रचले. त्यात ते म्हणतात –
वरमिह नीरे कमठो मीनः किं वा तीरे शरटः क्षीणः ।
अथवा श्वपचो मलिनो दीनस्तव न हि दूरे नृपतिकुलीनः ।। (श्लोक ११)
अर्थ : हे गंगे, तुझ्यापासून दूर जाऊन कुलीन राजा बनण्यापेक्षा तुझ्या या पाण्यातील कासव अथवा मासा होणे किंवा तुझ्या तिरावर रहाणारा सरपटणारा क्षुद्र प्राणी अथवादीन-दुबळा चांडाळ होणे, हे कधीही श्रेष्ठ आहे.
३. महाभारतात (पर्व ३, अध्याय ८३, श्लोक ९७ मध्ये)पुलस्त्यऋषी भीष्माला सांगतात,
यत्र गङ्गा महाराज स देशस्तत्तपोवनम् ।
सिद्धिक्षेत्रं च तज्ज्ञेयं गङ्गातीरसमाश्रितम् ।।
अर्थ : हे महाराजा, ‘जिथून गंगा वहाते, तो देश आणि गंगातिरावर असलेले तपोवनहे सिद्धीक्षेत्र आहे’, असे जाणावे.
४. तीराद्गव्यूतिमात्रं तु परितः क्षेत्रमुच्यते ।।
तीरं त्यक्त्वा वसेत्क्षेत्रे तीरे वासो न चेष्यते ।
– नारदपुराण, उत्तरखण्ड, अध्याय ४३, श्लोक ११९, १२०
अर्थ : गंगेच्या तिरापासून एक गव्यूतीपर्यंतच्या भागाला ‘क्षेत्र’ असे म्हणतात.(१ गव्यूती · २ कोस · ६ कि.मी.) गंगेचा तीर सोडून या क्षेत्रामध्ये निवासकरावा. गंगेच्या तिरावर निवास करणे योग्य नाही.
५. महाभारतात (पर्व ३, अध्याय ८२, श्लोक ६५ मध्ये) वर्णिले आहे,
गङ्गोद्भेदं समासाद्य त्रिरात्रोपोषितो नरः ।
वाजपेयमवाप्नोति ब्रह्मभूतो भवेत् सदा ।।
अर्थ : गंगोद्भेदतीर्थावर येऊन जो मनुष्य त्रिरात्र उपोषण करतो, त्याला वाजपेययज्ञाचे फळ लाभते आणि तो सर्वकाल ब्रह्मरूप होतो.
६. गंगाद्वार, प्रयाग आणि गंगासागरसंगम येथील गंगास्नानाचे माहात्म्य
सर्वत्र सुलभा गङ्गा त्रिषु स्थानेषु दुर्लभा ।
गङ्गाद्वारे प्रयागे च गङ्गासागरसङ्गमे ।।
तत्र स्नात्वा दिवं यान्ति ये मृतास्तेऽपुनर्भवाः ।।
– (गरुडपुराण, अंश १, अध्याय ८१, श्लोक १ अन् २)
अर्थ : गंगा ही भूतलावर अवतरल्यापासून पूर्वसागराला मिळेपर्यंत सर्वत्र सुलभअसली, तरी गंगाद्वार, प्रयाग आणि गंगासागरसंगम या तीन ठिकाणी ती दुर्लभ आहे.येथे स्नान करणारे स्वर्गाला जातात आणि जे देह त्यागणार्यांचा पुनर्जन्म टळतो.
गंगाजल प्रदूषितकरणार्या कर्मांचा ब्रह्माण्डपुराणात (अध्याय १, श्लोक ५३५ मध्ये) स्पष्ट शब्दांतपुढीलप्रमाणे निषेध केला आहे.
७. शौचमाचमनं केशनिर्माल्यमघमर्षणम् ।
गात्रसंवाहनं क्रीडा प्रतिग्रहमथो रतिम् ।।
अन्यतीर्थरतिं चैव अन्यतीर्थप्रशंसनम् ।
वस्त्रत्यागमथाघातसंतारं च विशेषतः ।।
अर्थ : गंगेच्या समीप शौच करणे, चूळ भरणे, केस विंचरणे किंवा विसर्जित करणे, निर्माल्य फेकणे, कचरा फेकणे, मल-मूत्रविसर्जन, हास्यविनोद करणे, दान घेणे,मैथुन करणे, अन्य तीर्थांविषयी प्रेम व्यक्त करणे, अन्य तीर्थांची स्तुती करणे, वस्त्रत्यागणे, गंगाजल आपटणे आणि गंगेत जलक्रीडा करणे, ही एकूण १४ कर्मे गंगेत वागंगेसमीप करणे निषिद्ध आहे.गंगेत वा गंगेसमीप निषिद्ध असलेल्या १४ कर्मांपैकी ७ कर्मे हीजलप्रदूषणाशी संबंधित आहेत.