विद्यारत्नं महद्धनम् ।
अर्थ : विद्यारूपी रत्न हे एक मोठे धन आहे.
सा विद्या या विमुक्तये ।
अर्थ : मोक्षप्राप्ती करणे शिकवते तीच खरी विद्या होय.
सत्यं कण्ठस्य भूषणम् ।
अर्थ : सत्य बोलणे हे गळ्यातील खरे आभूषण आहे.
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।
अर्थ : शरीर हे धर्माचरणाचे प्रथम साधन आहे.
संघे शक्तिः कलौ युगे ।
अर्थ : कलियुगामध्ये एकजुटीत शक्ती आहे.
आचार्यदेवो भव ।
अर्थ : आचार्यांमध्ये देव पहा.
मातृदेवो भव ।
अर्थ : मातेला देवाप्रमाणे पहा.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।
अर्थ : आई आणि जन्मभूमी या स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत.
गुरुशुश्रूषया विद्या ।
अर्थ : विद्या ही गुरूंच्या सेवेने प्राप्त होते.
व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् |
अर्थ : या जगतातील सर्व ज्ञान हे व्यासांचे उच्छिष्ट आहे.
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रति गच्छति ।
अर्थ : कोणत्याही देवतेला भक्तिभावाने केलेला नमस्कार भगवान श्रीविष्णूंपर्यंत पोहोचतो.
दुर्जनः परिहर्तव्यः विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।
अर्थ : दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
ऐक्यं बलं समाजस्य तदभावे स दुर्बलः ।
अर्थ : एकी (संघटितपणा) हे समाजाचे बळ असून ऐक्याच्या अभावी समाज दुर्बळ ठरतो.
ज्ञानं महेश्वरादिच्छेत् ।
अर्थ : शंकराकडून ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा करावी. (कारण तो सर्वज्ञ आहे.)
यतो धर्मस्ततो जयः ।
अर्थ : जिथे धर्म तिथेच विजय असतो.
क्षमा रूपं तपस्विनाम् ।
अर्थ : तपस्वी लोकांची क्षमा हीच ओळख असते.
गुरुसेवा गया प्रोक्ता ।
अर्थ : गुरूंची सेवा गया या तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे. (गुरुसेवेने तीर्थक्षेत्री गेल्याचे फळ मिळते.)
श्रद्धावाँल्लभते ज्ञानम् ।
अर्थ : श्रद्धावंतालाच ज्ञान मिळते.
सत्यं शिवं सुंदरम् ।
अर्थ : (ईश्वर) सत्य, मंगल आणि सुंदर (आहे).
आरोग्यं धनसम्पदा ।
अर्थ : आरोग्य ही मोठी संपत्ती आहे.
गुणाः पूजास्थानं गुणिषु न च लिंगं न च वयः ।
अर्थ : गुणांची जाण असलेल्यांना गुण हेच पूजास्थानी असतात. ते व्यक्तीचे वय अथवा ती स्त्री कि पुरुष ते पहात नाहीत.
विद्याविहीनः पशुः ।
अर्थ : विद्याविहीन मनुष्य हा मनुष्य नसून पशूच आहे.
योगक्षेमं वहाम्यहम् ।
अर्थ : (श्रीकृष्णाचे भक्तांना वचन – माझी अनन्य भावाने भक्ती करणार्यांचा) मी योगक्षेम वहातो.
जयतु जयतु भारती ।
अर्थ : भारतमातेचा विजय असो.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: ।
अर्थ : जेथे स्त्रियांना पूज्य मानले जाते तेथे देवता रममाण होतात.
पृथिवीभूषणं राजा ।
अर्थ : राजा हा पृथ्वीचे भूषण आहे.
हस्तस्य भूषणं दानम् ।
अर्थ : दानधर्म करणे हे हाताचे भूषण आहे.
सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ।
अर्थ : सर्व जग सत्यावर आधारलेले आहे.
सहसा विदधीत न क्रियाम् अविवेकः परमापदां पदम् ।
अर्थ : कोणतीही गोष्ट सारासार विचार न करता एकाएकी करू नये. अविवेक हा मोठ्या संकटांना कारणीभूत होतो.
सेवाधर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः ।
अर्थ : दुसर्यांची सेवा करणे हे फार कठिण काम आहे. मोठमोठ्या योग्यांना देखिल हे दुःसाध्य आहे.
सकलगुणभूषा च विनयः ।
अर्थ : नम्रता ही सर्व गुणांचे भूषण आहे.
यथा राजा तथा प्रजा ।
अर्थ : जसा राजा तशी प्रजा.
बुद्धिः कर्मानुसारिणी ।
अर्थ : बुद्धी ही कर्माचे अनुसरण करणारी असते. (आपण जसे कर्म करतो त्याप्रमाणे आपली बुद्धी बनते.)
पठतो नास्ति मूर्खत्वम् ।
अर्थ : अभ्यासू मनुष्य कधीही मूर्ख बनत नाही.
प्रज्ञा नाम बलं ह्येव निष्प्रज्ञस्य बलेन किम् ।
अर्थ : प्रज्ञा हेच खरे बळ आहे. प्रज्ञाहीन माणसाला बळाचा काय उपयोग ?
विनयात् याति पात्रताम् ।
अर्थ : नम्रतेमुळे पात्रता येते.
बली बलं वेत्ति न वेत्ति निर्बलः ।
अर्थ : बलवान माणूसच बळाची नीट परीक्षा करू शकतो. बलहीन ते जाणू शकत नाही.
नास्ति चात्मसमं बलम् ।
अर्थ : आत्मबलासारखे श्रेष्ठ दुसरे बळ नाही.
नास्ति ज्ञानात् परं सुखम् ।
अर्थ : ज्ञानापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट अधिक आनंददायी नाही.
नयेन चालंक्रियते नरेन्द्रता ।
अर्थ : राजाला नम्रतेनेच शोभा येते.
धिगाशा सर्वदोषभूः ।
अर्थ : सर्व दोषांस कारणीभूत असलेल्या आशा नामक दोषाचा धिक्कार असो.
न खलु वयस्तेजसो हेतुः ।
अर्थ : वय हे काही तेजाचे कारण असू शकत नाही. (ते स्वभावतःच असते.)
ज्ञानमेव शक्तिः ।
अर्थ : ज्ञान हीच खरी शक्ती आहे.
गतस्य शोचनं नास्ति ।
अर्थ : भूतकाळातील गोष्टींविषयी चिंता करू नये.
विद्या गुरूणां गुरु: ।
अर्थ : विद्या गुरुजनांनाही पूज्य आहे.
सत्यं वद । धर्मं चर ।
अर्थ : खरे बोल. धर्माचरण कर.
ज्ञानस्याभरणं क्षमा ।
अर्थ : क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
न मातु: परं दैवतम् ।
अर्थ : आईसारखे दुसरे श्रेष्ठ दैवत नाही.
बालादपि सुभाषितम् ।
अर्थ : लहान मुलाकडूनही शिकावे.
भावे हि विद्यते देव: ।
अर्थ : भाव तेथे देव.
विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।
अर्थ : विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ होय.
श्व:कार्यमद्य कुर्वीत ।
अर्थ : उद्याचे काम आज करावे.
शीलं परं भूषणम् ।
अर्थ : शील (चारित्र्य) हेच श्रेष्ठ भूषण होय.
नास्त्युद्यमसमो बन्धु: ।
अर्थ : उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
सर्वेऽपि सुखिन: सन्तु ।
अर्थ : जगात सगळे सुखी असोत.
सुखं हि दु:खान्यनुभूय शोभते ।
अर्थ : खूप दु:खे भोगल्यानंतर मिळणारे सुख खरोखर शोभून दिसते. (आनंद देते)
परोपकाराय सतां विभूतय: ।
अर्थ : सज्जनांचे ऐश्वर्य परोपकारासाठी असते.
चित्तप्रसादे प्रथमं यतस्व ।
अर्थ : मन प्रसन्न ठेवण्यासाठी प्रथम प्रयत्न कर.
सर्वार्थसम्भवो देह: ।
अर्थ : देह सर्व अर्थांच्या प्राप्तीचे साधन आहे.
उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि ।
अर्थ : उद्योगानेच कामे सिद्ध होतात.
अलसस्य कुतो विद्या ।
अर्थ : आळशी मनुष्याला विद्या कशी मिळणार ?
विद्वान् सर्वत्र पूज्यते ।
अर्थ : विद्वान मनुष्य सगळीकडे पूजिला जातो.
बुद्धिर्यस्य बलं तस्य ।
अर्थ : ज्याच्याजवळ बुद्धी असते तो बलवान ठरतो.
योजकस्तत्र दुर्लभ: ।
अर्थ : योजना करणारा (एखाद्या गुणाचा उपयोग करुन घेणारा) दुर्मिळ असतो.
अतिपरिचयात् अवज्ञा ।
अर्थ : अतिपरिचयाने अनादर होतो. (होऊ शकतो.)
त्रैलोक्यदीपको धर्म: ।
अर्थ : धर्म हा त्रिभुवनाचा दीपक (मार्गदर्शक) आहे.
वृक्षा: सत्पुरुषा इव ।
अर्थ : वृक्ष हे सत्पुरुषांप्रमाणे असतात.
विरला जानन्ति गुणान् ।
अर्थ : फार थोडे लोक गुणांना जाणतात.
सन्तोषतुल्यं धनमस्ति नान्यत् ।
अर्थ : समाधानासारखे दुसरे धन नाही.
चक्रवत् परिवर्तन्ते दु:खानि च सुखानि च ।
अर्थ : सुखदु:खे चाकाप्रमाणे पालटत असतात.
सुखार्थिन: कुतो विद्या ।
अर्थ : सुखाची इच्छा करणाऱ्याला विद्या कोठून मिळणार ?
समानशीलव्यसनेषु सख्यम् ।
अर्थ : सारखा स्वभाव आणि (सारखी) संकटे असलेल्यांची मैत्री होते.
गुणै: गौरवमायाति ।
अर्थ : गुणांनी (मनुष्याला) गौरव प्राप्त होतो.
सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ।
अर्थ : सर्व सत्यावर आधारलेले आहे.
विद्या राजसु पूज्यते ।
अर्थ : विद्या राजाच्या ठिकाणी पूजिली जाते.