श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे (भाग १)

१. श्रीकृष्णाने नवजात अर्भकाचे स्वागत करणे


1398840626_balak_bhav_1_C1_b

१ अ. चित्राचे विवरण

१ अ १. साधनेची तीव्र तळमळ असलेल्या एका साधिकेने स्वतःसाठी चित्र काढण्याची विनंती केल्यावर ‘प.पू. डॉक्टरांची (सनातनचे प्रेरणास्थान प. पू. डॉ. जयंत आठवले) इच्छा असल्यास ते काढून घेतील’, असे सांगणे आणि त्यांच्या मुलीला कन्यारत्न प्राप्त झाल्यावर चित्र काढण्याची प्रेरणा मिळणे : सोलापूर येथील सनातनच्या साधिका सौ. जयश्री तंगी अमेरिकेत असलेल्या त्यांच्या मुलीच्या बाळंतपणासाठी आल्या होत्या. (त्या वेळी सौ. उमाक्काही त्यांच्या अमेरिकास्थित मुलीकडे गेल्या होत्या. – संकलक) सौ. तंगी यांच्यामध्ये साधनेची तीव्र तळमळ आहे, त्यामुळे अमेरिकेत आल्यावरही त्या सत्संगासाठी अधिर झाल्या होत्या. त्यांनी मला त्यांच्यासाठी एक चित्र काढण्याची विनंती केली. मी त्यांना सांगितले, ‘‘मी प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच चित्रे काढत असल्याने ती सर्व त्यांचीच आहेत. त्यांची इच्छा असेल, तर कदाचित् ते माझ्याकडून चित्र काढून घेतील.’’

१६.११.२०१२ या दिवशी सौ. तंगी यांच्या मुलीला कन्यारत्न प्राप्त झाल्याचे मला समजले. त्या क्षणी मला चित्र काढण्याची प्रेरणा मिळाली.

१ अ २. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी जन्मलेल्या जिवाचे श्रीकृष्णाने स्वागत करून त्याला आशीर्वाद दिल्याचे चित्र रेखाटणे : त्यानंतर माझ्याकडून एक चित्र रेखाटले गेले. त्यात ‘हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी एक जीव जन्माला आला असून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याचे स्वागत करून त्याला आशीर्वाद देत आहे. मी उत्साहित असून श्रीकृष्णाने बाळाला माझ्याकडे द्यावे, यासाठी त्याच्या मागे लागले आहे’, असे दृश्य दाखवले आहे.’  – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (१७.११.२०१२)

१ आ. चित्राचे वैशिष्ट्य : ‘नवजात बाळ म्हणजे परमहंस अवस्थेतील उन्नत संत होय. ही अवस्था म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहं यांचा संपूर्ण लय होऊन जीव अन् शिव यांच्या मधुर मिलनाच्या सुवर्ण क्षणाचा आरंभ होय. या अवस्थेत सगुणत्वाने शुद्धत्वाची परिसीमा गाठलेली असून १०० टक्के शरणागतीचा टप्पा साध्य केलेला असतो. या अवस्थेत त्रिगुणाच्या बिजांचा लय होऊन सगुणत्वाचे विसर्जन होते आणि जीव त्रिगुणातीत होऊन निर्गुणात विलीन होऊ लागतो. कर्म, ध्यान, ज्ञान आणि भक्ती अशा कोणत्याही मार्गाने साधना करणार्‍या साधकाला नवजात बाळाप्रमाणे परमहंस अवस्था प्राप्त केल्याविना मोक्ष मिळत नाही.

नवजात बाळातील १०० टक्के शरणागतभाव आणि सूक्ष्मदेहांचा लेशमात्र अडथळा न रहाणे, यांमुळे भगवंताने त्याला आपल्या ओंजळीत उचलून घेतले आहे, तसेच त्याला उराशी घेऊन मोक्षधामी आगमन केल्याविषयी त्याचे प्रेमाने स्वागत केलेले आहे.’ – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री  १०.५०)

२. श्रीकृष्णाने त्याच्या बाललीलेच्या गोष्टींचे कथन करत दहीभात भरवणे


1398839969_balak_bhav_1_C2_b

२ अ. चित्राचे विवरण : ‘बाळ-कृष्णाने यशोदामातेला स्वतःच्या मुखात संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडवले होते. या आपल्या बाललीलेचे कथन करत श्रीकृष्ण साधिकेला दहीभात भरवत आहे.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई

२ आ. चित्राचे वैशिष्ट्य

प्रत्येक चित्रात त्याच्या विषयानुसार ‘स्त्रीवाचक देवत्व आणि पुरुषवाचक देवत्व’ साधिकेने अत्यंत सुंदरतेने प्रकट करून दाखवलले असणे : ‘अत्यंत बारकाईने पाहिले असता ‘श्रीकृष्ण साधिकेला दहिभात भरवत असतांनाच्या चित्रातील श्रीकृष्णाचे मुख स्त्रीरूपी वात्सल्याने भारलेले आहे’, असे वाटते. या चित्रातील डोळे, ओठ आणि कांतीही स्त्रीचीच वाटते, तरीही तो श्रीकृष्ण असल्याची जाणीव काही अल्प होत नाही. सौ. उमाक्कांच्या इतर चित्रांतील श्रीकृष्णाच्या मुखावर मात्र पुरुषीसौंदर्य आहे. प्रत्येक विषयानुसार स्त्रीवाचक देवत्व आणि पुरुषवाचक देवत्व साधिकेने अत्यंत सुंदरतेने प्रकट करून दाखवले आहे.’ – सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.९.२०१२)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग १) (कृष्णभक्तीचा आनंद देणारी चित्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह)’

Leave a Comment