श्रीकृष्णाने साधिकेला दिलेल्या अनुभूती दर्शवणारी कृष्णमय चित्रे (भाग १)

२. भगवंताच्या चरणी केलेल्या चित्ररूप प्रार्थना !


1398936330_balak_bhav_1_C11_b

२ अ. चित्राचे विवरण

१. पू. सत्यवानदादा (सनातनचे पाचवे संत पूज्यनीय सत्यवान कदम) करत असलेल्या प्रार्थनेचे भाषांतर करतांना प्रार्थनेतील भावार्थ अंतर्मनापर्यंत पोहोचून भावजागृती होणे आणि त्यातून बालकभावाचे चित्र साकारणे : ‘एकदा मी पू. सत्यवानदादांनी श्रीकृष्णाला केलेली प्रार्थना ऐकली होती. या प्रार्थनेतून ते ‘माझ्यामध्ये माता यशोदेचा वात्सल्यभाव (चित्र १), राधेचे निरपेक्ष प्रेम (प्रीती) (चित्र २), मीरेचा समर्पणभाव (चित्र ३), द्रौपदीचा याचकभाव (चित्र ४) आणण्यास मला शिकव, तसेच तू धनुर्धारी अर्जुनाला (चित्र ५) जसे मार्गदर्शन केलेस, तसे आम्हाला या धर्मयुद्धात मार्गदर्शन कर’, अशी श्रीकृष्णाला आळवणी करायचे. या प्रार्थनेचे तामिळ भाषेत भाषांतर करतांना तिच्यातील भावार्थ माझ्या अंतर्मनापर्यंत पोहोचून माझी पुष्कळ भावजागृती झाली. बालकभावाचे हे चित्र म्हणजे भगवंताच्या चरणी केलेल्या चित्ररूप प्रार्थनाच होत. – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग १)
(कृष्णभक्तीचा आनंद देणारी चित्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह)

Leave a Comment