श्रीकृष्णाने साधिकेला दिलेल्या अनुभूती दर्शवणारी कृष्णमय चित्रे (भाग ३)

६.  श्रीकृष्णाचे मर्दन (मालिश) करणे


1398937853_balak_bhav_1_C15_b

६ अ. चित्राचा भावार्थ

चित्र अ. श्रीकृष्णाने त्याची मान आणि खांदे दुखत असल्याचे सांगितल्यावर बालिकेने तेथे मर्दन करणे : ‘भगवान श्रीकृष्ण प्रतिदिन माझी किती काळजी घेत आहे ! तो मला जेवू घालतो, झोपवतो आणि माझ्या दिशेने त्याची मान वळवून मला गोष्टीही सांगतो. त्यामुळे एक दिवस श्रीकृष्णाने त्याची मान आणि खांदे दुखत असल्याचे निमित्त केले. सर्वशक्तीमान आणि अजिंक्य असा माझा भगवंत माझ्यासाठी सर्वस्व असल्याने त्याला दुःख होत असलेले मी पाहू शकत नव्हते. त्यामुळे मी माझ्या इवल्या इवल्या हातांनी त्याची मान आणि खांदा यांठिकाणी मर्दन करू लागले. याची जणू तो वाटच पहात असल्याप्रमाणे मर्दन पूर्ण होण्यापूर्वीच माझ्या हातांच्या स्पर्शाने अकस्मात् त्याच्या वेदना थांबल्याचे श्रीकृष्णाने सांगितले. त्याला हसतांना पाहून मला अत्यानंद झाला.

चित्र आ. श्रीकृष्णाने वेदना थांबल्याचे सांगून या सेवेची भेट म्हणून त्याने बालिकेला सोन्याचा कंबरपट्टा देणे : मी केलेल्या या पिटुकल्या सेवेसाठी त्याने मला सोन्याचा चकाकणारा कंबरपट्टा भेट म्हणून दिला. त्याची परतफेड करण्यासाठी मी अत्यानंदाने त्याला आलिंगन देऊन त्याची पापी घेतली. माझ्या चित्रामध्ये मला मिळालेली ही नवीन भेट मी परिधान केलेली आहे.

– सौ. उमा रवीचंद्रन्, चेन्नई

७.  साधिकेचा वात्सल्यभाव व्यक्त होणार्‍या कृती !


1398938277_balak_bhav_1_C16_b

७ अ. चित्राचे विवरण : ‘हे चित्र पू. सत्यवानदादा (पूजनीय सत्यवान कदम हे सनातनचे पाचवे संत आहेत) यांनी सांगितलेल्या प्रार्थनेतून प्रेरणा मिळून काढलेल्या ‘भगवंताच्या चरणी केलेल्या चित्ररूप प्रार्थना’ या चित्राचा उत्तरार्ध आहे. बालकभावात असल्यामुळे सर्व प्रकारच्या भावांमध्ये यशोदामातेच्या वात्सल्यभावाकडेच मी अधिक आकर्षित होते. मी श्रीकृष्णाचे बाळ असल्यामुळे भगवंताकडून माझ्यावर होणारा वात्सल्याचा वर्षाव मी अनुभवते. मुले अनुकरणप्रिय असून आपल्या प्रिय पालकांच्या कृतींचे अनुकरण करत असल्यामुळे मलाही ‘यशोदामाता होऊन बाळकृष्णाचा सांभाळ करावा, त्याची काळजी घ्यावी’, असे वाटते. हे चित्र दिवसभरात मी बाळकृष्णाची कशी काळजी घेतली, त्याचे क्रमवार दर्शन घडवते.

चित्र क्रमांक १ – सकाळी मी बाळकृष्णाला जागे करून त्याला न्हाऊ घालत आहे.

चित्र क्रमांक  २ – त्यानंतर मी त्याला मऊ पंचाने प्रेमाने पुसत आहेे.

चित्र क्रमांक ३ – मातृभावात असल्यामुळे ‘स्नान झाल्यावर त्याला सर्दी होऊ नये’, अशी मला काळजी वाटते; म्हणून मी त्याला स्नान झाल्यावर धूप दाखवत आहे.

चित्र क्रमांक ४ – त्यानंतर मी त्याला छोटेसे धोतर नेसवत आहे आणि केवळ त्याच्यासाठी बनवलेली छोटी तुळशीची माळ गळ्यात घालून त्याला सजवत आहेे.

चित्र क्रमांक ५ – आता मी त्याला गोपीचंदनाचा तिलक लावत आहे.

चित्र क्रमांक ६ – माझ्या बाळकृष्णाला भूक लागल्यामुळे आता मी त्याला लोण्याप्रमाणे मऊ केलेला दहीभात भरवत आहे.

चित्र क्रमांक ७ – तो खेळण्याच्या मनःस्थितीत असल्यामुळे आम्ही लपाछपी खेळत आहोत.

चित्र क्रमांक ८ – इतर गोपी माझ्या छोट्या कृष्णाने त्यांच्या घरातील लोणी चोरल्याचे गार्‍हाणे माझ्याकडे मांडतात. मी रागावल्याचे नाटक करत ‘तू खरोखरच लोणी चोरले आहेस का ?’, असे त्याला विचारत आहे.

चित्र क्रमांक ९ – वाईट दृष्टी/शक्ती यांपासून रक्षण व्हावे, यासाठी सायंकाळी मी त्याची दृष्ट काढत आहे. तो साक्षात् परमेश्‍वर असून चांगले आणि वाईट यांवर त्याचेच नियंत्रण आहे, तरीही ‘अज्ञानात सुख असते’ या म्हणीप्रमाणे मी त्याची दृष्ट काढते.

चित्र क्रमांक १० – अशा प्रकारे मौजमजेच्या वातावरणात दिवस घालवल्यानंतर माझ्या छोट्या कृष्णाला आता झोप आल्याने मी त्याला माझ्या मांडीवर झोपवून अंगाई म्हणत आहे.

भगवान श्रीकृष्ण माझ्याकडून वात्सल्यभाव व्यक्त होणार्‍या या कृतींकडे कौतुकाने आणि प्रेमाने पहात आहे. प.पू. डॉक्टरांची ही अद्भूत लीला आहे. त्यांच्या कृपावर्षावामुळेच मला बालकभावात राहून ही वात्सल्यभावाची अद्भूत अनुभूती घेता येत आहे.

– सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (१५.२.२०१३, सकाळी ६.००)

७ आ. चित्राचे वैशिष्ट्य : ‘बालकभावातील जीवात्म्यामध्ये वात्सल्यभक्तीचा उदय झाल्यावर बालकाच्या कृतीतून वात्सल्यभावाचे दर्शन होते. बाल्यावस्थेच्या तबकात वात्सल्यभावाचे निरांजन, कधी पंचारती, तर कधी कापुरारती बनून भगवंताचे केलेले हे पूजन आहे. वात्सल्यभाव रसाने नटलेल्या नवविधाभक्तींच्या नऊ सुमनांना गुंफून वात्सल्यभक्तीचा हार बनवून तो श्रीकृष्णाला अर्पण केला आहे.’ – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)

८. श्रीकृष्ण पहुडला असून त्याचे पाय चेपतांना स्वतः एक प्रौढ माता असल्याप्रमाणे जाणवणे


1398938300_balak_bhav_1_C17_b

८ अ. चित्राचे विवरण : ‘प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याचे चित्र काढून घेण्यासाठी पुढ्यात उभा होता. चित्र पूर्ण होईपर्यंत श्रीकृष्ण उभा असल्याने आता तो आराम करण्यासाठी पहुडलेला आहे. श्री महालक्ष्मी श्रीविष्णूशी एकरूप झाली असल्याने श्रीकृष्णाचे पाय चेपायला कोणीच नाही; म्हणून मी त्याचे पाय चेपत आहे आणि मी अंगाईसुद्धा म्हणत आहे. (त्या वेळी मी एक प्रौढ माता असल्याप्रमाणे मला जाणवले.) – सौ. उमा रवीचंद्रन्, चेन्नई

९.  श्रीकृष्णाचे चरण घट्ट धरून ठेवणे


1398938318_balak_bhav_1_C18_b

९ अ. चित्राचे विवरण

प.पू. डॉक्टरांचे (सनातनचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. आठवले यांचे) आज्ञापालन करून साधिकेने श्रीकृष्णाचे चरण घट्ट पकडून ठेवणे ! : ‘आज मी प.पू. डॉक्टरांचे मार्गदर्शक बोल वाचले, ‘७० टक्के आध्यात्मिक पातळी गाठेपर्यंत ईश्‍वराचा हात आपण सोडायचा नाही, तो धरून ठेवायचा आहे. ७० टक्के पातळी गाठल्यानंतर ईश्‍वरच आपला हात कायमस्वरूपी धरून ठेवतो.’ माझा ईश्‍वर ‘अजानुबाहू’ आहे आणि मी त्याच्यापुढे पुष्कळ लहान आहे. त्यामुळे मी त्याचे हात व्यवस्थितपणे पकडू शकत नाही. माझे हात त्याच्या चरणांपर्यंतच पोहोचत असल्यामुळे मी ते घट्ट धरून ठेवले आहेत आणि ते कधीही न सोडण्याचा मी निर्धार केला आहे. हे पाहून श्रीकृष्णाच्या मुखावर ‘या मुलीचे मी काय करू!’ अशी भावमुद्रा उमटली आहे.’ – सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (१५.१०.२०१२)

९ आ. चित्राचे वैशिष्ट्य : ‘बाल्यावस्थेतील आनंदाकडून सूक्ष्म अहंचा लय झाल्यावर कर्तेपणाच्या सूक्ष्म लयामुळे प्राप्त झालेली शरणागत अवस्था दर्शवणारे हे चित्र आहे. कटीवर कर ठेवून विठ्ठलाप्रमाणे उभ्या असलेल्या श्रीकृष्णाने स्थुलातून कर्मेंद्रियांना अकार्यरत करून काहीही कर्म न करता साक्षीभावाची अवस्था धारण केल्याप्रमाणे वाटते. स्थुलातून श्रीकृष्ण जरी काहीही करतांना दिसत नसला, तरी सूक्ष्मातून प्रत्येकात वास करून तोच सर्व कर्म करत आहे, याची जाणीव सूक्ष्म अहं गळून गेलेल्या बालिका भक्ताला झालेली आहे.

जन्म मृत्यूच्या फेर्‍यांतून सोडवण्यासाठी ‘हे भगवंता, तूच माझ्याकडून अकर्म कर्म करवून घे आणि सर्व कर्मबंधनांतून  मला मुक्त करून कायमचे तुझ्या चरणांशी स्थान दे’, अशी शरणागतभावाने प्रार्थना करून समर्पण भक्ती करणार्‍या अहंशून्य अवस्थेतील भक्ताचे दर्शन या चित्रातील बालिका भक्ताच्या मुद्रेतून घडत आहे. – (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान, १८.७.२०१३, रात्री १०.५०)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘‘बालकभावा’तील चित्रे (भाग १)
(कृष्णभक्तीचा आनंद देणारी चित्रे त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसह)

Leave a Comment