१. क्रांतीकारकांना भागोजी साहाय्य करत असल्याच्या संशयावरून
इंग्रजांनी त्याला एक वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावून बडतर्फ करणे
क्रांतीकारक भागोजी नाईक हे पूर्वा नगर जिल्ह्याच्या पोलीस दलात कार्यरत होते. उत्कृष्ट शरीरसंपदेच्या बळावर त्यांना ब्रिटिशांच्या पोलीस दलात नोकरी मिळाली होती. भागोजी तलवारीसह तीरकामठा आणि बंदूकही उत्तम चालवायचा. ब्रिटिशांविरुद्ध उभारलेल्या लढ्याच्या कहाण्या भागोजींनी ऐकल्या आणि आपल्याच लोकांच्या विरोधात कारवाई करणे त्याच्या स्वाभिमानी मनाला मानवेना. 'भागोजी क्रांतीकारकांना साहाय्य करतो', असा संशय इंग्रज अधिकार्याना येऊ लागला. त्यांनी त्याला एक वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावून बडतर्फ केले.
२. भागोजीने चालू केलेल्या मोहिमा
भागोजीने परिसरातील तरुणांना प्रशिक्षण देऊन सशस्त्र मोहिमा चालू केल्या. सरकारी कचेर्याजाळणे, सरकारचा खजिना लुटणे असे प्रकार तो करू लागला.
अ.१०.८.१८५७ या दिवशी त्याने मोठा उठाव केला. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने नगरचा पोलीसप्रमुख जेम्स विल्यम हेन्री याला सशस्त्र कुमक घेऊन पाठवले.
आ.४ ऑक्टोबरला झालेल्या संघर्षात भागोजीकडून हेन्री मारला गेला.
इ.नंतर दोन आठवड्यांनी झालेल्या चकमकीतही भागोजीने ब्रिटिशांना धूळ चारली.
३. इंग्रज सरकारला त्याने सळो की पळो करून सोडले होते; पण ११.११.१८५९ या दिवशीच्या चकमकीत भागोजी मारला गेला.
– एम्.एस्. पाटील, नगर (दै. लोकसत्ता १०.१२.२०१०)