१. निसर्गाचे रक्षण मानवाच्या रक्षणासाठी अत्यावश्यक: सनातन हिंदु धर्म सांगतो, ‘आम्ही निसर्गाचे एक अविभाज्य घटक आहोत. निसर्गाशी सहकार्य करूनच आम्हाला आमचा उत्कर्ष साधता येईल. निसर्गावर आक्रमण करण्याचा विचार व्यर्थ आहे. यालाच आम्ही धर्म म्हणतो. त्यासाठीच विधीनिषेध आहेत. सनातन हिंदु धर्मियांचा आचार (विधीनिषेध) निसर्गाला समृद्ध करणारा असतो.
२. प्रजेला धर्माचरण करायला भाग पाडल्यामुळेच भूकंप, रोगराई आणि दुष्काळ इत्यादी नाहीसे होणे: अजूनही आमच्या पवित्र देशात गोवंश हत्याबंदी होत नाही. आम्ही निधर्मी भूकंपामागून भूकंप आणि दुष्काळामागून दुष्काळ यांना आमंत्रण देत नाही का ? प्रजेला धर्माचरण करायला भाग पाडा. शासनाचे ते कर्तव्य आहे. भूकंप, रोगराई, दुष्काळ इत्यादी आपत्ती पहाता पहाता काढता पाय घेतील. – प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, नोव्हेंबर २००५)
३. निसर्गावर प्रेम करा !: मानव म्हणजे निसर्गाचे एक अंगच आहे. निसर्गाला जखमी करून मानवाला कसे काय जगता येईल ? निसर्गावर प्रेम करा. त्याचा सहयोग घ्या आणि त्याला सहयोग करा, अन्यथा पृथ्वीवर माणूसच उरणार नाही. सनातन धर्माची प्रतिष्ठापना करा. धर्मजीवनाला अनुकूल असे वातावरण, कायदे आणि व्यवस्था करा. मग निसर्ग आणि भारतखंड कसा मोहोरतो, ते बघा ! – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, १.२.२००७, अंक १, वर्ष २)
प्रदूषणनिवारणाची भूमिका
प्रदूषणामुळे जीवसृष्टीला किती मोठा धोका निर्माण झाला आहे, हे प्रदूषण असेच चालू राहिले, तर जीवसृष्टी नष्ट होण्याचा निश्चित धोका कसा निर्माण झाला आहे आणि त्यावरच्या उपायांसाठी वसुंधरारक्षण परिषद स्थापन करून सर्व राष्ट्रे शास्त्रज्ञांंच्या या विषयावरील निवारणमुक्तीचा विचार करून त्यासाठी विविध निधी गोळा करणार आहेत, असे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्याचबरोबर त्याच वर्तमानपत्रात प्रदूषण निर्माण करण्यात सिंहाचा वाटा असूनसुद्धा सध्याची एकमेव महासत्ता अमेरिका आणि इतर युरोपीय मोठी राष्ट्रे जमा करावयाच्या निधीचा मोठा वाटा स्वीकारण्यास कशी टाळाटाळ करत आहेत, हेसुद्धा वाचले.
काहीही झाले, तरी मानवतेच्या दृष्टीने सर्व विकसित, तसेच अविकसित राष्ट्रांनी उशिरा का होईना, एकत्र होऊन त्याविषयी विचारविनिमय चालू केला आहे, ही आनंदाचीच गोष्ट आहे.